30.9 C
Mumbai
Monday, June 15, 2026
घरराजकारणअकाल तख्तने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ठरवले 'गुरू द्रोही'

अकाल तख्तने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ठरवले ‘गुरू द्रोही’

व्हायरल व्हीडिओमुळे मान यांच्याविरोधात रोष

Google News Follow

Related

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना मोठा धक्का देत अकाल तख्तने त्यांना “गुरू-द्रोही” (गुरु दोखी) घोषित केले आहे. या निर्णयाद्वारे आम आदमी पक्षाच्या नेत्याला आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना शीख समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, शीख समाजाने त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी शीख धर्माचे सर्वोच्च धार्मिक-लौकिक पीठ असलेल्या अकाल तख्ताने भगवंत मान यांना शीख श्रद्धाळूंबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे समन्स बजावले होते. मान अकाल तख्तासमोर हजर झाले होते. तसेच एका व्हायरल व्हिडिओबाबत त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्या व्हिडिओमध्ये भगवंत मान यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती शीख गुरूंच्या प्रतिमांवर मद्य शिंपडत असल्याचे दिसत होते.

भगवंत मान यांनी हे आरोप फेटाळून लावत संबंधित व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, फॉरेन्सिक तपासणीत व्हिडिओ खरा असल्याचे स्पष्ट झाले. व्हिडिओ खरा असल्याचे समोर आल्यानंतर आम आदमी पार्टीने भूमिका बदलत सांगितले की व्हिडिओ खरा असू शकतो, परंतु फॉरेन्सिक तपासणीत त्यातील व्यक्ती भगवंत मानच आहेत हे सिद्ध झालेले नाही.

हे ही वाचा:

‘छावा’ चित्रपटात चमकलेल्या संचिता उगलेची आत्महत्या

शरद पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद चितपट

खान सरविरोधातील वाद; जामीन मिळाल्यानंतर रोशन आनंद तुरुंगाबाहेर,

जर्मनीने रचला इतिहास, फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा संघ

पाच सिंह साहिबांच्या (उच्च धर्मगुरूंच्या) बैठकीनंतर अकाल तख्ताचे जत्थेदार कुलदीप सिंग गर्गज यांनी अकाल तख्ताच्या फसील (व्यासनपीठ) वरून निर्णय जाहीर केला. त्यांनी शीख समाजाने भगवंत मान यांच्याशी सर्व संबंध तोडावेत, असे सांगितले.

भगवंत मान यांना समाजबाह्य घोषित करण्याबरोबरच अकाल तख्ताने नव्याने मंजूर झालेल्या जग्गत जोत श्री गुरू ग्रंथ साहिब सत्कार या कायद्यावरही तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अकाल तख्ताने या कथित धर्मग्रंथ अवमान प्रतिबंधक विधेयकावर स्वाक्षरी करणाऱ्या सर्व शीख आमदार आणि मंत्रिमंडळ सदस्यांना २९ जून रोजी अकाल तख्तासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा