28 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरराजकारण'वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पैसे मागितले गेले का, याची चौकशी करा'

‘वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पैसे मागितले गेले का, याची चौकशी करा’

Related

महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी नागपूरला झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राकडून उद्योगांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी अशी सूचना केली. तसेच हा उद्योग महाराष्ट्राबाहेर गेला त्यासाठी कोणती कारणे आहेत, हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी पैसे मागितले गेले का, याची चौकशी करा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे.

त्यांनी बीएमडब्ल्यू उद्योग कसा काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राबाहेर गेला, याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, २००४मध्ये बीएमड्ब्ल्यूचा प्रकल्प महाराष्ट्राचा आला होता. विलासरावांचं सरकार होतं. मंत्रालयात बैठक ठरली. विलासराव अर्जंट कामाला जायचं होतं तेव्हा अधिकाऱ्यांना सांगितलं की, तुम्ही या बैठकीत बसा. सर्व लोक मंत्रालयात बसले. बीएमडब्ल्यूचे अधिकारी दाक्षिणात्य होते. महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी नन्नाचा पाढा वाचायला सुरुवात केली. सोयी एवढ्या लवकर मिळणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. नकारात्मक शेरेबाजी सुरू केल्यावर बीएमडब्ल्यूचे अधिकारी तडक निघाले. त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तिथे कारखाना गेला. जर अशा प्रकारे आपले लक्ष नसेल, पैसे मागितले जात असतील तर कोण येतील महाराष्ट्रात?

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’

“काँग्रेस पक्षातील कारस्थानांमुळे मला मुख्यमंत्रीपदावरून हटवले”

महाराष्ट्र, गुजरात व्हाया पाकिस्तान

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

 

महाराष्ट्रातून जर उद्योग बाहेरच्या राज्यात जात असतील तर महाराष्ट्राचे लक्ष नाही. त्यामुळे वेदांता प्रकल्प का गेला, या उद्योगाकडे पैसे मागितले गेले का, याची चौकशी व्हावी, असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर उत्तर प्रदेश बिहार झारखंडवर लक्ष द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती. कारण उत्तर प्रदेशातील लोक हे इतर राज्यात नोकरी धंद्याच्या निमित्ताने जाऊ नयेत, त्यांना त्यांच्या राज्यात नोकरी मिळावी. महाराष्ट्रातील हा उद्योग अस्थिर राजकारणामुळे बाहेर गेला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा