29 C
Mumbai
Sunday, April 21, 2024
घरराजकारणभाजपच्या दाव्यामुळे उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत पेच

भाजपच्या दाव्यामुळे उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत पेच

१० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या १० जागांसाठी आज, मंगळवारी मतदान होणार आहे. भाजपने आठ उमेदवार उतरवले नसते तर सर्व जागांवरील विजय सहजसोपा होता. मात्र आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

भाजपने आपला आठवा उमेदवार नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी उतरवला होता. आठव्या जागेसाठी भाजपने संजय सेठ यांना मैदानात उतरवले आहे. याआधी राज्यसभेच्या १० जागांसाठी १० उमेदवारच होते. यात भाजपचे सात तर, सपाच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. या १० जणांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. मात्र आता एका जागेसाठी या निवडणुकीची रंगत वाढली आहे.

भाजपच्या वतीने सुधांशु त्रिवेदी, आरपीएन सिंह, अमरपाल मौर्या, तेजपाल सिंह, नवीन जैन, साधना सिंह, संगीता बलवंत आणि संजय सेठ रिंगणात असून समाजवादी पक्षाच्या वतीने जया बच्चन, आलोक रंजन आणि रामजी लाल सुमन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपचे २५२ आमदार आहेत. त्यातील ३४ आमदार त्यांचे एनडीएच्या घटकपक्षांचे आहेत. दोन आमदार राजाभैयाचा पक्ष जनसत्ता दलाचेही आहेत. त्यांनी वेळोवेळी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांचीही मते मिळाल्यास भाजपकडे २८८ आमदारांचा पाठिंबा आहे.

मात्र, भाजपला आठ उमेदवार जिंकून आणण्यासाठी २९६ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपला त्यांचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आठ मते कमी पडत आहेत. तर, समाजवादी पक्षाला त्यांचे तीन उमेदवार जिंकून आणण्यासाठी १११ मतांची आवश्यकता आहे. समाजवादी पक्षाकडे त्यांचे १०८ आमदार आहेत. तसेच, काँग्रेसचे दोन आणि बसपच्या एका आमदाराचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. मात्र सपाचे आमदार इरफान सोलंकी सध्या तुरुंगात असल्याने ते मतदान करू शकत नाहीत.

हे ही वाचा:

ज्ञानवापी परिसरात १० तळघर आणि एक विहीर

‘असा मुलगा मेलेलाच बरा…’

पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर यांचा पदाचा राजीनामा!

तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…

सपाच्या आणखी एक आमदार पल्लवी रंजन यांनी मत देण्यास नकार दिला आहे. बसपाच्या एका आमदाराचेही मत त्यांना मिळेल की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे सपाकडे सध्या तरी केवळ १०८ आमदारांचेच समर्थन दिसते आहे. यानुसार, भाजपच्या आठपैकी सात तर, सपाच्या तीनपैकी दोन आमदारांना जिंकण्यात काहीही अडचण दिसत नाही. मात्र प्रश्न आहे तो भाजपच्या आठव्या तर, सपाच्या तिसऱ्या उमेदवाराचा. त्यामुळे मंगळवारी क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अखिलेश यादव यांनी त्यांच्या आमदारांच्या बोलावलेल्या बैठकीत आठ आमदार अनुपस्थित राहिल्यामुळे पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा