27 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरदेश दुनियाब्रिटनची धुरा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हाती?

ब्रिटनची धुरा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या हाती?

Related

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादलेले असताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पार्टी केली होती. मात्र, आता या पार्टीमुळेच जॉन्सन हे अडचणीत आले असून त्यांचे पंतप्रधान पदही अडचणीत आल्याचे वृत्त आहे. ब्रिटनचे अनेक खासदार आणि विरोधी नेते बोरिस जॉन्सन यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करत आहेत. ब्रिटिश मीडियाच्या म्हणण्यानुसार, बोरिस जॉन्सन यांना पद सोडावे लागले तर त्यांच्याऐवजी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना पंतप्रधान पदाची संधी मिळू शकते.

गेल्या वर्षी प्रिन्स फिलीप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला जॉन्सन यांच्या कर्मचाऱ्यांनी पार्टी केली होती. लॉकडाऊन काळात निर्बंध असताना त्यांच्या डाउनिंग हाऊस निवासस्थानाच्या गार्डनमध्ये पार्टी केल्याच्या वृत्तावरून वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर जॉन्सन यांनी बुधवारी ब्रिटनची संसद हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माफीही मागितली आहे. मात्र, या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून आता त्यांच्या पक्षाच्या खासदारांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे.

विरोधी पक्षाकडून जॉन्सन यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, अडचणीत आलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असून यानंतर त्यांची जागा भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांची पंतप्रधान पदी वर्णी लागू शकते, असे वृत्त आहे.

हे ही वाचा:

२४ तासात देशात अडीच लाख कोरोना रुग्ण

‘स्थायी समितीत भ्रष्टाचारावर बोलू देत नाहीत’; महापौरांना लिहिले पत्र

या कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

केंद्र म्हणते महाराष्ट्रात पुरेसा लससाठा आहे

ब्रिटनची एक प्रमुख सट्टा कंपनी ‘बेटफेअर’ने पुढचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक या नाववर सट्टा लावला आहे. भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे पंतप्रधान बनू शकतात, असा दावा ‘बेटफेअर’ने केला आहे. ऋषी सुनक यांच्यासोबतच लिझ ट्रस (परराष्ट्र मंत्री), मायकेल गोव्ह (कॅबिनेट मंत्री), माजी परराष्ट्र सचिव जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रिती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा