26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकारणखासदारांच्या दबावानंतर भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठींबा

खासदारांच्या दबावानंतर भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठींबा

Related

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदारांनी पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली होती. खासादारांच्या मागणीला प्राधान्य देत उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. मुर्मू या महिला आहेत आणि आदिवासी समाजाच्या आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असे स्पष्ट मत काही खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले होते.

काल मातोश्री बंगल्यावर शिवसेना खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काही जुन्या राजकीय घडामोडींची आठवण करून दिली. पक्षप्रमुखांचे आदेश शिवसैनिक पाळत असतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सर्वात आधी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हीच मागणी आणखी ११ खासदारांची असल्याची माहिती समोर आली होती.

हे ही वाचा:

सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स; २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

लोक पेटवत आहेत सोन्याची लंका !

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनुसूचित जमातीची एक महिला सर्वोच्च पदावर पोहचत आहे आणि लोकशाहीची सुंदरता वाढवत आहे. त्यात शिवसेनेने पाठींबा दिला तर महाराष्ट्रात आणि अन्य सर्वच स्तरावर त्याचं स्वागत आहे, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा