31 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरराजकारण'कॉक्रोच' नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा

‘कॉक्रोच’ नेत्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा

सोनम वांगचुक यांचं सीजेपीच्या नेत्यांबाबत मोठं विधान

Google News Follow

Related

नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ अर्थात सीजेपीच्या नेत्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचं आपल्याला जाणवलं, असं वांगचुक यांनी म्हटलं आहे. मात्र, राजकारणात जाण्याची इच्छा असणं ही चुकीची बाब नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच ते संत नाहीत, असं निरीक्षणही वांगचुक यांनी नोंदवलं.

आंदोलनादरम्यान या नेत्यांचं जवळून निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची जाणीव झाली, असं वांगचुक यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी स्वतःहून आपल्यासमोर राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आंदोलनात सहभागी असलेले नेते कोणत्याही स्वार्थाशिवाय काम करत आहेत, असं गृहीत धरता येणार नाही, अशा आशयाचं विधान करत वांगचुक यांनी आंदोलनातील नेतृत्वाच्या भूमिकेवर भाष्य केलं.

हे ही वाचा:


नेपाळच्या महापुराचा बँकिंग व्यवस्थेलाही मोठा फटका

६ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करणारा बलराज पोलीस चकमकीत ठार

‘भारत बोलतो तेव्हा जग कान देऊन ऐकतं’

पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान

दरम्यान, आंदोलनाच्या व्यासपीठाचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी होऊ नये, यावर वांगचुक यांनी विशेष भर दिला. हे आंदोलन भाजप, काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाचं नसून विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि त्याची हीच ओळख कायम राहिली पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. आंदोलन राजकीयदृष्ट्या स्वतंत्र राहिलं, तर सरकारवर दबाव आणणाऱ्या प्रभावी ‘प्रेशर ग्रुप’च्या रूपात ते अधिक परिणामकारक ठरू शकतं, असंही त्यांनी सांगितलं.

अभिजीत दिपके याचा यापूर्वी आम आदमी पक्षाशी संबंध असल्याच्या चर्चांबाबतही वांगचुक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. एखाद्या राजकीय पक्षासोबत पूर्वी काम केलं असणं ही चुकीची बाब नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे सीजेपीच्या नेतृत्वाची राजकीय महत्त्वाकांक्षा आणि आंदोलनाची तटस्थता हे दोन मुद्दे वेगळे ठेवण्याची गरज असल्याचं सोनम वांगचुक यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा