27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरराजकारणद्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा

द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा

Related

देशात १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या मोर्चेबांधणीला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या पुढाकाराने काही नेत्यांनी पक्षाच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवार, ८ जुलै रोजी लखनौला एनडीएच्या खासदार आणि आमदारांकडून पाठिंबा मागितला होता. यादरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवाणीला भाजपाच्या मित्रपक्षांच्या नेत्यांशिवाय, समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीत असलेले सुहेलदेव, भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, प्रगतिशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, प्रगतशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल सिंह यादव हे सुद्धा सामील होते. या मेजवाणीदरम्यान दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. द्रौपदी मुर्मू यांना भाजपा, अपना दल, निर्बल भारतीय शोषित हमारा आम दलाच्या खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचा:

बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या छापेमारीत मिळाली ४० कोटींची चित्रे आणि शिल्पकृती

“इस्लाम, ख्रिश्चनांचा अपमान अपमान; हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं काय?”

शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर

कारुळकर प्रतिष्ठानतर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा सत्कार

दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांचे लखनौ विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले होते. त्यांच्या स्वागतला विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, अपना दल (एस) नेते आशिष पटेल आणि निषाद पक्षाचे नेते डॉ. संजय निषाद यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा