25 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरराजकारणकेजरीवालांच्या गाडीवर दगडफेक; तरुणांना गाडीने धडक दिल्याचा भाजपाचा आरोप

केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक; तरुणांना गाडीने धडक दिल्याचा भाजपाचा आरोप

‘आप’कडून भाजपावर टीका

Google News Follow

Related

दिल्लीत निवडणुकीच्या धामधुमीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरोघरी प्रचारादरम्यान त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ‘आप’ने शनिवारी केला. प्रचारादरम्यान गाडीवर दगडफेक करून ‘आप’च्या प्रचारात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात येत आहे. ‘आप’ने भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांच्यावर या प्रकरणी आरोप केले आहेत. तर, भाजप उमेदवार परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांच्या गाडीने तीन जणांना धक्का दिल्याचा आरोप केला आहे.

“भाजप उमेदवार परवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल प्रचार करत असताना त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना इजा करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते प्रचार करू शकणार नाहीत. भाजपवाले, केजरीवाल जी तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला चोख प्रत्युत्तर देतील,” असे ‘आप’ने व्हिडिओसह केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. व्हिडीओमध्ये केजरीवाल यांच्या गाडीवर एक दगड येताना दिसत आहे. तर व्हिडीओमध्ये ताफ्याजवळ काही तरुण काळे झेंडे दाखवताना दिसत आहेत.

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार परवेश वर्मा म्हणाले की, “तीन तरुण अरविंद केजरीवाल यांना स्वतःच्या नोकरीबद्दल काही प्रश्न विचारत होते. त्यावेळी या तीन तरुणांना अरविंद केजरीवाल ज्या गाडीत बसले होते त्या गाडीने धडक दिली. पहिले, चालकाने एकदा ब्रेक लावला होता, पण त्यानंतर केजरीवाल यांनी वाहन सुरू करण्याचा इशारा दिला आणि चालकाने वाहन सुरू केले. हा हत्येचा कट रचल्याचे प्रकरण आहे. हे तीनही तरुण या प्रकरणी एफआयआर दाखल करणार आहेत,” अशी माहिती परवेश वर्मा यांनी दिली आहे.

हे ही वाचा..

सैफ हल्ला प्रकरणी मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून दोन संशयित ताब्यात

तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य

केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे

राजनाथ सिंह यांनी त्रिवेणीच्या संगमात केले स्न्नान

अरविंद केजरीवाल लढत असलेला नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जात असून याकडे सर्वांचे लक्ष आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेसने दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे आणि भाजपने पश्चिम दिल्लीचे माजी खासदार, माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा