विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर विरोधकांकडून या अपयशाचे खापर सातत्याने ईव्हीएमवर फोडण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार उत्तम जानकर हे दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आमदार उत्तम जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर २३ जानेवारी रोजी दिल्लीला निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत. तसेच तातडीने बॅलेट पेपरवर माळशिरस येथील पोटनिवडणूक जाहीर करावी, अशी मागणी ते करणार आहेत.
हे ही वाचा..
केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक; तरुणांना गाडीने धडक दिल्याचा भाजपाचा आरोप
सैफ हल्ला प्रकरणी मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून दोन संशयित ताब्यात
तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य
केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाज उपयोगी ठरावे
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावानंतर आता धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध होत असल्याची माहिती आहे. धानोरे गावात उत्तम जानकरांना ईव्हीएममध्ये ९६३ मते पडली होती. यानंतर पुन्हा हात उंचावून मतदान घेण्यात आल्यानंतर त्यांना १२०६ मते पडली. त्यामुळे धानोरे आणि मरकडवाडी गावातील हजारो मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावे तयार केले आहे. हे प्रतिज्ञापत्र २३ जानेवारीला निवडणूक आयोगाला देणार असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच याच दिवशी मुख्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर न केल्यास उत्तम जानकर आणि बच्चू कडू दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन करणार आहेत.