29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारण'ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे'

‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’

Google News Follow

Related

एकीकडे महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक पॅकेजसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरावा अशी मागणी करतात आणि तिकडे कोकणच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझा पॅकेजवर विश्वास नाही असे म्हणतात, यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

कोकणातील जनतेला आम्ही नुकसान भरपाई देणारच आहोत, पण महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. तरच ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. त्यावर भातखळकर यांनी ट्विटरवरून तिखट शब्दांचा वापर करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री कोकणात जाऊन सांगतात की माझा पॅकेजवर विश्वास नाही…बहुदा अविश्वास फक्त देताना असतो, घेताना नाही. असेही यावर मलिक यांनी मुक्ताफळे उधळली.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी लगतच्या गावांना खूप मोठा फटका बसला. अनेकांची घरे उद्धवस्त झाली. तसेच आंबा बागायतदारही पुरता कोलमडून पडला. त्यामुळे कोकणाला या वादळामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याच  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोकणचा धावता दौरा केला. अवघ्या तीन तासांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा कोकण दौरा करून वादळ पीडितांची भेट घेतली आणि त्यांचे दुःख समजून घेतले.

विरोधकांच्या केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले खरे पण तिथेही पुन्हा केंद्राकडूनच मदतीची याचना त्यांनी केली. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आतापर्यंत विविध गोष्टींसाठी सातत्याने केंद्रापुढे हात पसरल्याचे दिसले आहे. केंद्राकडून मदत मिळत नाही, असाच सूर त्यांनी वेळोवेळी लावला आहे.

गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामध्येही कोकणवासियांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतु अजून त्या पीडितांना मदत मिळालेली नाही. नुकसानग्रस्त सरकारकडे आशेने बघत आहेत, यंदा तरी काही मदत पदरात पडेल. सरकारी कार्यालयांना गेल्या वर्षी झालेल्या नुकसानाचे खेटे मारून ते थकले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा