29.3 C
Mumbai
Thursday, May 21, 2026
घरराजकारण१४ दिवसाचं अधिवेशन झालं तर ठाकरे सरकारला तेरवीची भिती

१४ दिवसाचं अधिवेशन झालं तर ठाकरे सरकारला तेरवीची भिती

Google News Follow

Related

कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकार आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपा नेत्यांनी जोरदार विरोध केलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १४ दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटत असल्याची घणाघाती टीका केलीय.

‘ठाकरे सरकारला भीती वाटतेय. ४ दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अधिवेशन जर १४ दिवसाचं झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकते’, असा जोरदार टोला मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला लगावलाय. तर नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत, दुसरीकडे अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निवड झाली नाही, याबाबत विचारलं असता, ‘या तिन पक्षांमध्ये नाराजी होऊच शकत नाही. कारण, एकदा सत्तेची चटक लागली की नाराजी दोन दिवसांपुरती उरते. १९ तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधींचा वाढदिवस होता, त्या दिवशी केक खाऊ घालायचे, त्याच दिवशी जोडे खाऊ घालायची भाषा झाली. मी याकडे लक्ष देत नाही. या तीन पक्षांमध्ये कोण नाराज आहे याकडे आम्ही पाहत नाही तर जनता नाराज राहता कामा नये ही आमची भूमिका आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र डागलंय.

हे ही वाचा:

उत्तरप्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्यावर रासुका

तिसरा पर्याय विसरा

महत्वाचे सामने इंग्लंडमध्ये घेऊ नयेत, इंग्लंडच्या या दिग्गज खेळाडूचे विधान

संजय राऊत हे शरद पवारांच्या पे रोलवर

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन होऊच नये, यासाठी कोरोनाचं कारण दिलं जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा