33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणमुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान

मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी सरकारी अनुदानित चार्टर्ड विमान सोडून साध्या विमानाने जाण्याचा निर्णय

Google News Follow

Related

गुजरातचे मुख्यंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या आजारी मुलाला भेटण्यासाठी सरकारचे चार्टर्ड विमान सोडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी सरकारी अनुदानित चार्टर्ड विमान सोडून साध्या विमानाने जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या आजारी मुलाला अहमदाबादहून मुंबईला रुग्णालयात नेण्यासाठी एअरलिफ्ट करण्यात आले होते, त्या सरकारी अनुदानित एअर ऍम्ब्युलन्स पैसेही मुख्यमंत्र्यांनी भरले. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली.

‘गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी सार्वजनिक जीवनात सचोटी आणि साधेपणाचे उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या लाखो लोकांसाठी त्यांचे आचरण प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे. त्यांचा मुलगा अनुज लवकर बरा व्हावा, यासाठी मी प्रार्थना करतो,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

एकाच ऍपमधून रेल्वे तिकीट, टॅक्सी, हॉटेल बुक करता येणार

सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स प्रकरणांचा शिवकुमार यांना फटका?

सहा राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी एनआयएकडून छापेमारी

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर १० लाखांचा दंड

नेमके प्रकरण काय? 

भूपेंद्र पटेल यांचा एकुलता एक मुलगा अनुज पटेल याला ३० एप्रिल रोजी ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यामुळे तो कोमात गेला. त्यांना अहमदाबादच्या केडी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले पण, तेथील डॉक्टरांनी त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल करण्याची शिफारस केली. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी आपल्या मुलाला मुंबईला नेण्यासाठी सरकारी एअर ऍम्ब्युलन्स भाड्याने घेतली. अनुजला आता हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंगळवारी तो शुद्धीवर आला.
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आजारी मुलाला मुंबईतील रुग्णालयात दाखल केल्यानंतर पाच वेळा त्याची भेट घेतली. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरकारी अनुदानित चार्टर्ड विमान न घेता साध्या विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा