25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरराजकारणसिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं, पाणबुडी प्रकल्प राज्यातचं!

सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं, पाणबुडी प्रकल्प राज्यातचं!

पाणबुडी प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक

Google News Follow

Related

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याच्या बातम्या मधल्या काही दिवसात आल्या होत्या. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून हा प्रकल्प राज्यातच असल्याचं सांगण्यात येत होतं. यावर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.

महाराष्ट्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याची घोषणा केली होती. या अंतर्गत सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकार राबवणार होतं. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू होते.

रविंद्र चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला येथेच होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली.

“या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे(एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी उपस्थितांना दिले,” अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जनतेला विश्वास दिला होता की, पर्यटन पाणबुडी प्रकल्प आपल्या राज्याचा आहे आणि तो आपल्या राज्यातून बाहेर जाणार नाही.

प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले पर्यटन पाणबुडी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा २०१८ मध्ये महायुती सरकारच्या काळात झाली होती. तत्कालीन पर्यटन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत जाहीर घोषणा केली होती. मविआच्या काळातही याची घोषणा झाली होती. परंतु, पाचपेक्षा जास्त वर्षे उलटून गेल्यानंतरही हा मार्गी लागलेला नाही.

हे ही वाचा:

पत्रकार परिषद सुरू असतानाचं दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्ष नेत्यावर हल्ला

योगी सरकारचा मोठा निर्णय; स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक!

भारत सरकारने ‘तहरीक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!

‘अयोध्येला भेट द्या… तुम्हाला त्रेतायुगात गेल्यासारखे वाटेल’

दरम्यान, गुजरातमध्ये पहिला पाणबुडी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले. त्यामुळे राज्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची टीका विरोधकांनी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा