25 C
Mumbai
Tuesday, February 10, 2026
घरक्राईमनामादाऊद छोटा शकील गँगच्या नावे एकनाथ खडसेंना धमकीचे फोन

दाऊद छोटा शकील गँगच्या नावे एकनाथ खडसेंना धमकीचे फोन

पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या घरी धमकीचा फोन आला होता. धमकीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

माहितीनुसार, चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आले आहेत. यानंतर एकनाथ खडसे यांच्यावतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार एकनाथ खडसे यांना दाऊद छोटा शकील गँगकडून ही धमकी देण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकी देण्यात आली आहे. पहिल्या फोनवरून त्यांना सांगण्यात आलं की, दाऊद छोटा शकील गँग तुम्हाला मारणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर दुसऱ्या वेळी फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्ही तुम्हाला सांगितलं तरीदेखील तुम्ही कोणती पावले उचलली नाहीत. असे चार वेळा फोन आले.”

हे ही वाचा:

ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत नऊहून अधिक राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ होणार

रामनवमी: रावणाच्या अत्याचारातून मुक्तीसाठी भगवान विष्णूंचा सातवा अवतार

ग्लेन मॅक्सवेलने घेतला आयपीएलमधून ब्रेक

‘स्वतः आंबेडकरही भारताचे संविधान बदलू शकत नाहीत’!

एकनाथ खडसे यांना आलेल्या धमकीच्या फोनपैकी एक फोन अमेरिकेवरून आला आहे, तर एक लखनऊ येथून आल्याची माहिती आहे. याआधीही त्यांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. धमकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. भाजपाची साथ सोडून अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला होता. मात्र, आता लवकरच ते स्वगृही म्हणजेच भाजपामध्ये परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कदाचित या पार्श्वभूमीवर धमकीचा फोन येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात पोलीसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा