27.2 C
Mumbai
Thursday, July 23, 2026
घरराजकारण"आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं"

“आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं”

मंत्री उदय सामंत यांचा घणाघात

Google News Follow

Related

राजधानी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षाने सत्ताधारी मोदी सरकारला घेरले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून प्रतिक्रिया उमटत असताना मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना सुनावले आहे.

उदय सामंत म्हणाले, “चौथ्या स्तंभाबद्दल मला आदर आहे. अभिजीत दिपके यांच्या माणसाने दिल्ली पोलिसांना मारहाण केली असं मी म्हणत नाही. मात्र, बाहेरून घुसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हे कृत्य केले आहे. म्हणूनच तो लाठीचार्ज झाला, हे पाप विरोधकांचे आहे. आंदोलनामध्ये घुसकोरी केली नसती तर लाठीचार्ज झाला नसता.” नीट पेपरफुटीवरुन सुरू असलेल्या आंदोलनातील अभिजीत दिपके आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आम्हाला शंभर टक्के आदरणीय सहानुभूती आहे. पण बाहेरून येऊन काहीजण नाटक करत आहेत, असे म्हणत उदय सामंत यांनी दिल्लीतील आंदोलनात विरोधक आपली माणसं घुसवत असल्याचा आरोपच त्यांनी केला.

हे ही वाचा:

‘कॉकरोच जनता पार्टी’चे इन्स्टाग्रामवरील अधिकृत अकाउंट हटवले


शिवसेना खासदार विलिनीकरण प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

लाठीचार्जप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार

इटर्नलची तुफान झेप! नफ्यात २६८ टक्क्यांची उसळी

दिल्लीतील नीट पेपरफुटीप्रकरणाच्या या आंदोलनामध्ये विरोधक स्वार झाले आहेत. एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम केलं जात आहे. या मंचावर आरएसएसला शिव्या घालण्याची गरज काय? ‘नीट’बाबत आता कोणीही बोलत नाही असं विद्यार्थी बोलत आहेत. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यापर्यंत हे गेले आहेत, हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे आणि बोलत आहे. आंदोलन यशस्वी होत असताना आपला यातून राजकीय फायदा होऊ शकतो त्याच भावनेतून सर्व एकत्र आले आहेत, असे म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा