34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरराजकारणदंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरेंचे स्वप्न आजही जिवंत

दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरेंचे स्वप्न आजही जिवंत

आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Google News Follow

Related

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरेंचे स्वप्न आजही जिवंत आहे, असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

“राज्यात ज्या दंगली होत आहेत त्या मागचे मास्टर माईंड काही दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकमध्ये आले होते. शरद पवारांच्या शेजारील सोफ्यावर ते बसले होते. कलानगर हा त्याचा पत्ता आहे, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न आजही जिवंत आहे. १९९३ ला दंगली झाल्या आणि १९९५ ला सत्ता आली, अशी उद्धव ठाकरेंची धारणा आहे.

मातोश्रीवर २००४ ला झालेल्या बैठकीत माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याबाबत पुष्टी देऊ शकतात. या दंगलीमध्ये उद्धवजी मास्टर माईंड आहेत का? याची चौकशी व्हावी,” अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

“ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन नेते एकमेकांचं तोंड बघत नव्हते. त्यांचे सूर जुळायला लागले आहेत. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. हा दंगलीचा प्लॅन आहे का? मुसलमान समाजात दंगली घडवून आपला मतदान वाढवायचं हा उद्धव ठाकरेंचा प्लॅन परत एकदा होतोय का? हे शरद पवार यांनी ओळखावं. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्ती चादर टाकण्याचा प्रयत्न झाला.आधी महाराजांच्या गडकिल्ल्यावर अतिक्रमण सुरू केलं. आता तर धार्मिक स्थळाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्या घरात देखील येतील,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

उमेदवार मृत्यूमुखी पडली, पण मतदारांनी निवडून आणले

‘मुख्यमंत्रिपद ही वडिलोपार्जित मालमत्ता नाही’

वारकऱ्यांना राज्य सरकारकडून भेट! श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता ५ हजार विशेष गाड्या

अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार

“कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय होताच पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला येतात. काँग्रेसचे खरे मनसुबे उघडे पडत आहेत. त्यांना महत्वाची खाती देण्याचे काँग्रेसने वचन दिले आहे. राज्यात जे घडत आहे तसा प्रयत्न त्यांच्या धार्मिक स्थळावर झाला तर पूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटला असता. हिंदू एकत्र येत नाहीत हे त्यांना माहीत आहे. हिंदू समाज झोपला आहे आणि ही शोकांतिका आहे,” असंही नितेश राणे म्हणाले.

“आम्हाला हिंदू समाजाची साथ मिळाली पाहिजे. कर्नाटकात जिहादीची सत्ता आली आहे. तेच चित्र महाराष्ट्रात यावं यासाठी रजा अकादमी, ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक झाली. चादर चढविणे, छत्रपतींच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचे आदेश हे सर्व पूर्वनियोजित प्लॅन आहे. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव आणि आदित्य ठाकरे १० जनपथ ला का गेलेले? झाडू मारण्यासाठी गेलेले का? मातोश्रीचा पोपट मेलेला आहे हे आमचे अध्यक्ष लवकरच जाहीर करतील, अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा