28.2 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026
घरराजकारण'मी कोणत्याही शर्तींचे उल्लंघन केलेले नाही, सगळ्या धर्मियांच्या कार्यक्रमाला मी जातो!'

‘मी कोणत्याही शर्तींचे उल्लंघन केलेले नाही, सगळ्या धर्मियांच्या कार्यक्रमाला मी जातो!’

आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने ओढले गेले होते वादात

Google News Follow

Related

मी रमजान ईदला जातो, जैन, शीख धर्माच्या कार्यक्रमात जातो, त्याच अनुषंगाने मी सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमालाही गेलो होतो. आम्ही इफ्तार पार्टीलाही जातो. तिथे मी रमझानच्या बाबत बोलतो. सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात मी मानवी कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थना बोलून दाखविल्या. त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरीतील प्रार्थनाही बोलून दाखविली अमली पदार्थांच्या तरुणाईला होणाऱ्या हानीबद्दल देखील बोललो. त्याशिवाय पोलिस दलातील संधी बद्दल बोललो, त्यामुळे त्या (संघाच्या) कार्यक्रमात जाऊन कुठेही मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तीचे उल्लंघन केलेले नाही, अशा शब्दांत नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.

आयुक्त म्हणून नागपूरची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना पहिलाच प्रश्न त्यांच्यासंदर्भात गेल्या काही दिवसांत झालेल्या वादाचा होता.

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंससेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून केलेल्या भाषणानंतर सोशल मीडियातून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. विशेष म्हणजे काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली. मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही पोस्ट लिहून नांगरे पाटील यांनी राजीनामा देत भाजपा किंवा आरएसएसमध्ये दाखल व्हावे अशी टीका केली होती.

संघाच्या कार्यक्रमातील सहभागाबद्दल विश्वास नांगरे पाटील यांनी भूमिका मांडली. मला सगळ्यांचा प्रचंड आदर आहे, मी पोलिस सेवेचा अधिकारी असून माझी पूर्ण कटिबद्धता संविधानाशी आणि त्याच्या मूल्यांशी आहे. नागपुरात दीक्षाभूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझे मार्गदर्शक आहेत, विविध संघटना, संस्था यांच्या कार्यक्रमामध्ये जाणे आणि तिथे उपस्थित लोकांना भेटणे स्वभाविक आहे, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

भयंकर तापमानामुळे युरोपात डांबरच नव्हे सिग्नलही वितळले, रस्ते उखडले

भारताच्या १२ एलपीजी जहाजांनी टोलशिवाय ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी

इस्कॉनकडून कोलकाता येथील प्रमुख धर्मगुरूंची हकालपट्टी

दक्षिण कोरियाच्या प्रशिक्षक होंग म्युंगबो यांचा राजीनामा

सदर सकल हिंदू समाजाचा कार्यक्रम १९ एप्रिलचा आहे. त्यासाठी सानपाडा येथील कार्यकर्ते निमंत्रण घेऊन आले होते. त्यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक होते. डॉक्टर, इंजीनियर आदिंचा समावेश त्यात होता. तिथे जीएसटी संदर्भात मार्गदर्शन तिथे झाले, आध्यात्मिक मार्गदर्शन ही त्याठिकाणी काही तज्ज्ञांनी केले. मी गेली ३० वर्ष पोलीस सेवेत आहे. हा क्रार्यक्रम वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५०  वर्षे आणि आरएसएसला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने होता. त्यामुळे मी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले असे वाटत नाही, असे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले

मी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी कार्यभार स्वीकारला आहे. ऑरेंज सिटी आणि टायगर कॅपिटलमध्ये पहिल्यांदाच काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दाखवला आहे, ते पाहता ही मोठी जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था राखणे, कोर पोलिसिंग करणे, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठेवणे हे माझे प्राधान्य राहील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा