बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापल्यानंतर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृतीचं कारण पुढे करून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाची भूमिका स्पष्ट करणारं पत्रक जारी करण्यात आलं आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सही असलेल्या पत्रात पक्षाने म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून अशी स्पष्ट भूमिका आहे की संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याच्या निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी पक्षाची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालधीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही, परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट आयंत स्पष्टपणे सांगू इध्छितो की कोणत्याही गुन्द्राला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.
पुढे म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जवाबदार राजकीय नेता माणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्द्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती. या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्वाचा संदेश देत आहे न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा विश्वास पूर्ण आहे आणि त्यांच्या कामात कधीही हस्तक्षेप करणार नाही, न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
श्री. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेल्या राजीनामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी जारी केलेले पत्रक @SunilTatkare pic.twitter.com/ZxgvO2qnLe
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 4, 2025
हे ही वाचा..
वनतारा येथील केंद्रातील वन्यजीवांवर पंतप्रधान मोदींची मायेची फुंकर
अबू आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवा, अधिवेशनातून निलंबित करा
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे दिले कारण
पीओकेमधील उपस्थितीनंतर भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करावं
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पीएच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारत पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवल्याचे म्हटले. राजीनामा दिल्यानंतर धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.