31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणभाजपा आमदाराने का लिहिलं अमित शहांना पत्र?

भाजपा आमदाराने का लिहिलं अमित शहांना पत्र?

Google News Follow

Related

राज्याचं राजकारण गेले काही आठवडे ड्रग्जच्या मुद्द्यावरून तापलेलं असताना, आता भाजपा आमदार अमित साटम यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच या बाबत पत्र लिहिलं आहे. पत्रामधून त्यांनी एन. एन. वोहरा समितीचा अहवाल देशासमोर सादर करण्याची मागणी अमित शहांकडे केली आहे.

“आज मी या देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या देशावर आणि खासकरून मुंबई शहरावर आणि महाराष्ट्रावरही, नार्को टेरारिज्मचा प्रहार झालेला दिसून येतो. मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि त्याचा व्यवसाय हा अंडरवर्ल्ड कंट्रोल करत असतात. त्यामुळे १९९३ मध्ये झालेल्या स्फोटानंतर एन. एन. वोहरा साहेबांची जी कमिटी गठित करण्यात आली होती. त्या वोहरा समितीच्या अहवालामध्ये मोठ्या प्रमाणावरती अंडरवर्ल्ड, माफिया, ब्युरोक्रसी सरकारी अधिकारी तसेच राजकीय नेते यांच्यामधले घनिष्ठ संबंध याच्यामधले आर्थिक व्यवहार यांच्या संदर्भामध्ये पुराव्यांसकट हा रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर स्वतःला नेते म्हणवून घेणारी लोकं कशा प्रकारे या अंडरवर्ल्डशी हात मिळवणी करून या अँटीनॅशनल ऍक्टिव्हिटी मध्ये सामील होते, याच्या वरती त्याच्यामध्ये अहवाल आहे.” असं अमित साटम म्हणाले.

हे ही वाचा:

ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर

WHO: सगळीकडे कोविड केसेस कमी, अपवाद फक्त…

राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…

मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट

परंतु या आवारातल्या ११० पानांच्या अहवालात फक्त १० पानं  १९९५ साली सादर करण्यात आली होती आणि शंभर पानांचा अहवाल अजून पर्यंत देशासमोर आलेला नाही. त्यामुळे या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केलेली आहे की या देशाच्या हितासाठी या देशाच्या युवकांच्या हितासाठी आणि नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीकोनातून एन. एन. वोहरा कमिटीचा संपूर्ण ११० पानांचा अहवाल आहे देशासमोर आला पाहिजे. कोण या देशाच्या विरुद्ध होते हे जाणण्याचा अधिकार हा भारतीय नागरिकाचा आहे.” असंही अमित साटम म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा