28.2 C
Mumbai
Tuesday, July 7, 2026
घरस्पोर्ट्सविश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियावर २२ कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव

विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियावर २२ कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव

Google News Follow

Related

लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झालेल्या महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव करत विक्रमी सातव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयासह ऑस्ट्रेलियन संघावर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचीही बरसात झाली.

यंदा आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकाच्या एकूण बक्षीस रकमेतील १० टक्क्यांनी वाढ करत ती ८७.६४ लाख अमेरिकी डॉलर (सुमारे ८३.४१ कोटी रुपये) इतकी ठेवली होती. विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला २३.४० लाख डॉलर (सुमारे २२.२७ कोटी रुपये) इतकी घसघशीत रक्कम मिळाली.

अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या इंग्लंडला ११.७० लाख डॉलर (सुमारे ११.१३ कोटी रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय महिला संघालाही स्पर्धेत सहभाग आणि साखळी फेरीतील तीन विजयांच्या जोरावर एकूण सुमारे ३.२३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. पाकिस्तानला या स्पर्धेतून २.६४ कोटी रुपये मिळाले.

उपांत्य फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना ६.७५ लाख डॉलर (सुमारे ६.४२ कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम देण्यात आली.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १५० धावा केल्या. नेट सायव्हर-ब्रंटने ५३ चेंडूत ५८ धावांची खेळी केली, तर फ्रेया कॅम्पने २८ चेंडूत नाबाद ४४ धावांचे योगदान दिले.

१५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने केवळ १७.१ षटकांत ३ गडी गमावून विजय मिळवला. बेथ मूनीने ४९ चेंडूत ६४ धावांची दमदार खेळी केली, तर फोएबे लिचफिल्डने ३५ चेंडूत ४८ धावांचे मोलाचे योगदान दिले. शानदार कामगिरीबद्दल बेथ मूनी हिला ‘सामनावीर’ आणि ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ हे दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा