31.4 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरस्पोर्ट्सकबड्डीत भारताने जपानचा उडवला धुव्वा!

कबड्डीत भारताने जपानचा उडवला धुव्वा!

Google News Follow

Related

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाने दणदणीत विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यजमान जपानचा ४९-२३ असा एकतर्फी पराभव केला. संपूर्ण सामन्यात भारतीय रेडर्स आणि बचावपटूंनी प्रभावी कामगिरी करत जपानवर वर्चस्व राखले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय रेडर्सनी जपानच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. आशू मलिकने एकाच रेडमध्ये जपानच्या तीन खेळाडूंना बाद करत शानदार सुपर रेड नोंदवली. आशूने सातत्याने गुण मिळवत भारताच्या आघाडीमध्ये महत्त्वाची भर घातली.

भारतीय बचावपटूंनीही उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या सत्रात भारताने जपानला तब्बल दोन वेळा ऑलआउट केले. त्यामुळे भारताने पहिल्या सत्राचा शेवट ३१-९ अशा मोठ्या आघाडीसह केला.

दुसऱ्या सत्रात जपानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि वेगाने गुण मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारताने पवन सेहरावत, अर्जुन देशवाल आणि अस्लम इनामदार या त्रिकुटाला मैदानात उतरवले. अर्जुनने मैदानात येताच गुण मिळवत भारतीय संघाची आघाडी कायम ठेवली. यानंतर भारताने पुन्हा एकदा जपानला ऑलआउट केले.

सामन्याच्या अखेरीस जपानच्या बचावपटूंनी भारतीय रेडर्सच्या काही चढायांना यशस्वीपणे रोखले. मात्र, भारताने आधीच मोठी आघाडी घेतल्याने जपानला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. आशू मलिक आणि राहुल हे भारताच्या विजयाचे प्रमुख शिलेदार ठरले.

भारतीय संघाचा पुढील सामना मंगळवारी दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे. जपानविरुद्धची विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा