27 C
Mumbai
Monday, September 28, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणबुडती अमेरिका कोसळत्या सौदीला वाचवेल काय?

बुडती अमेरिका कोसळत्या सौदीला वाचवेल काय?

Related

आंतरराष्ट्रीय व्यापारातील डॉलरची सद्दी संपू नये म्हणून अमेरिका आता कोणाचाही गळा कापायला तयार आहे. ज्या सौदी अरेबियामुळे जगभरात पेट्रो-डॉलर रुजला, त्या देशाला अमेरिकेने वाऱ्यावर सोडले आहे. हुथी दहशतवादी सौदी अरेबियाच्या तेल आस्थापनांवर घणाघाती हल्ले चढवत असताना “लष्करी हस्तक्षेप करणार नाही”, असे अमेरिकेने ठणकावून सांगितले आहे. घायकुतीला आलेला सौदी अरेबिया आता चीनच्या ‘एमब्रिज’ या डिजिटल पेमेंट सिस्टीममधून बाहेर पडून अमेरिकेला खूश करण्याचा प्रयत्न करतो आहे. एका बाजूला एमब्रिजची कोंडी करत असताना, अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने भारताच्या यूपीआयची मात्र प्रशंसा केली आहे. अमेरिकेचे जगावरील वर्चस्व, त्यांचे लष्करी सामर्थ्य, अर्थकारणाची मजबुती आणि जगातील व्यवहारांमध्ये डॉलरचा वापर या तीन खांबांवर अवलंबून आहे. सध्या त्यांचे अर्थकारण डळमळले आहे. अमेरिकेवर ४० ट्रिलियन डॉलरच्या कर्जाचा बोजा आहे. रोज ७३५ कोटी डॉलरचे कर्ज वाढते आहे. दुसऱ्या बाजूला सौदीच्या अर्थकारणालाही ग्रहण लागले होते. कर्जाचा बोजा वाढत होता. इराण युद्धाच्या काळात सौदीच्या उत्पन्नाचा प्रमुख भाग असलेल्या तेलाच्या धंद्यावर संकट आले. सौदी अडचणीत असताना अमेरिकेने आखातातील कित्येक वर्षांची मैत्री असलेल्या या देशाला अधिक संकटात टाकण्याचे काम केले. सौदी आता चक्क अमेरिकेच्या पायावर लोटांगण घालताना दिसतो आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा