जी-७ परीषदेत सहभागी व्हायला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर ३५ मिनिटे चर्चा केली. काँग्रेस आणि त्यांच्या तैनाती फौजेच्या नेत्यांना अचानक भारताचे परराष्ट्र धोरण कमकुमवत झाल्याचा भास व्हायला लागला. त्यांना पाकिस्तानचे पडेल फिल्ड मार्शल आसिफ मुनीर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सोबत शाही खाना घेणार असल्याचे कौतूक वाटते आहे. घरगडी मालकाच्या जवळच असतात. त्यांच्या चहा नास्त्याची व्यवस्था मालक करत असतो. कॅनडाहून परतताना अमेरिकेत येऊन जा हे, ट्रम्प यांचे आमंत्रण मोदींनी नाकारले, हे काँग्रेसला महत्वाचे वाटत नाही. जोडे पुसण्यासाठी आणि ते उचलण्यासाठी ताकद लागत नाही, समोरच्याला नाही म्हणायला ताकद लागते. मोदींनी ती ताकद दाखवली आहे



