शिवसेनेच्या दोन्ही गटांनी गुरुवारी मुंबईत ५९वा वर्धापनदिन साजरा केला. त्यात दोन्ही गटांकडून जोरदार भाषणबाजी झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सभा वरळीच्या सरदार वल्लभभाई स्टेडियमच्या डोममध्ये झाली तर उद्धव ठाकरेंची सभा षण्मुखानंद सभागृहात झाली. त्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून शाब्दिक वार करण्यात आले.
त्यात उद्धव ठाकरे यांनी ‘प्रहार’ या नाना पाटेकर यांच्या चित्रपटाचा उल्लेख करताना त्यातील कम ऑन किल मी, हा संवाद म्हणून दाखवत शिंदे यांच्या शिवसेनेला आव्हान दिले. त्याची दखल शिंदे यांनी आपल्या भाषणात घेतली. ते म्हणाले, मेलेल्यांना काय मारायचे?
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी प्रहार पाहिला. नाना पाटेकर यांचा. त्यात नाना पाटेकर गुंडासमोर उभा राहतो आणि सांगतो ‘कम ऑन किल मी’. तसा मी या गद्दारांसमोर उभा आहे. म्हणतोय ‘कम ऑन किल मी’. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा.
त्यावर एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, इंग्रजी चित्रपट पाहून आले असतील. लंडनला सुट्टीसाठी गेले होते, त्यावेळी. ‘मरे हुए को क्या मारना है’, महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेत तुमचा मुडदा पाडलेला आहे. नुसता करून नाही शोर, मनगटात येत नाही जोर लागतो, हे लक्षात ठेवा. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही.
शिंदे म्हणाले की, सध्या मुंबईत कुणीतरी एक मोहीम सुरू केली आहे, मुंबईचा लढा…मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला. इतकी वर्षे काय करत होता. तुम्हीच होता ना. सत्तेत असताना काय केलं. तेव्हा तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईसाठी लढा. घरात बसून लढता येत नाही. लोकांशी संवाद साधावा लागतो. आधी घराबाहेर पडा.
हे ही वाचा:
ओसामा विसरलात का?” शशी थरूर यांचा डोनाल्ड ट्रम्पना टोमणा
मुंबई विमानतळावर २५ कोटींचा गांजासह गुजरातच्या दाम्पत्याला अटक
छत्तीसगढमध्ये १६ वर्षांपासून राहणाऱ्या घुसखोर बांगलादेशी जोडप्याला अटक!
मागच्या दाराने आलेले, शून्य जनाधार असलेले, राऊत…
मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची होती आणि राहील. सात पिढ्या उतरल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही. मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही, असे सांगत शिंदे म्हणाले की, विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकात काय झाले ते आपल्याला माहीत आहे. २०१४ साली शिवसेनेने २८२ जागा लढवल्या ६३ जागा जिंकल्या स्ट्राइक रेट २२ टक्के होता. २०१९साली शिवसेनेने १२४ जागा लढविल्या ५६ जागा जिंकल्या तेव्हा ४५ टक्के स्ट्राइक रेट होता. २०२४ला शिवसेनेने ८० जागा लढविल्या आणि ६० जागा जिंकल्या. ८५ जागा उबाठाने लढविल्या २० जागाच जिंकल्या. स्ट्राइक रेट २३ टक्के होता. आपल्यापेक्षा एक तृतियांशही मते त्यांना मिळाली नाहीत. ज्या जागा जिंकल्या काँग्रेसच्या व्होट बँकेच्या मेहेरबानीवर मिळाल्या. शिवसेनेचे हक्काचे मतदार उबाठाला टाटा बाय बाय केले आहे. जनतेने या निवडणुकीत बिनपाण्याने हजामत केली आहे.
आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेत आहे तर अहंकार त्यांना विनाशाकडे नेत आहे. महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे. हिंदुत्वाची व्याख्या करताना शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं, माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही राष्ट्रधर्म पाळणारे हिंदुत्ववादी आहोत. हा देश आपला मानतो तो आमचा आहे. देशासाठी कुर्बानी देणारा कोणी असो तो आमचा आहे.” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या काँग्रेसचा बाळासाहेबांनी विरोध केला. त्यांच्या दावणीला शिवसेना बांधण्याचे पाप कुणी केले हे आपल्याला माहीत आहे. असा विश्वासघातकी माणूस महाराष्ट्राने पाहिला नाही. सरडा रंग बदलतो, पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राला पाहिला.
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण विचार सोडले नाहीत. हिंदुत्व सोडले नाही.
किती उतावीळ झालेत, लाचार झालेत, युती करता का म्हणून विचारत आहे. माणसाचे दिवस, परिस्थिती कधी बदलेले हे सांगता येत नाही. सत्तेत असताना सगळ्यांना कस्पटासमान लेखणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे. सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती आली आहे. निवडणुका आल्यावर हिंदुत्व, मराठी माणूस आठवतोय.
शिंदे म्हणाले, तुम्ही पीएफआयची तुलना आरएसएसशी करता हे कुठले हिंदुत्व आहे? कधी सोडायचे, कधी धरायचे अशी त्यांची भूमिका आहे. असे केल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला जागा दाखविली.
