पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील प्रचारसभेत काँग्रेसजनांकडून त्यांना देण्यात आलेल्या ९१ शिव्यांचा उल्लेख केला. या शिव्यांचा आपण भेट म्हणून स्वीकार करता असेही ते म्हणाले. मोदींनी कधीही या शिव्यांची चिंता केली नाही. उलट मन की बातसारख्या कार्यक्रमातून त्यांनी जनसंवादाला महत्त्व दिले. त्याची शतकपूर्ती आता होत आहे.



