29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसानव्हे केवळ बुद्धिदाता असे परब्रह्म स्वरूप!

नव्हे केवळ बुद्धिदाता असे परब्रह्म स्वरूप!

Related

गणपती म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर गजमुख, लंबोदर, एकदंत अशा मंगलमूर्तीच्या रूपाची प्रतिमा उभी राहते. गणपतीची अनेक नावे आणि विविध रूपे आपण पाहतो. मात्र श्री गणेशपुराणाच्या उपासनाखंडातील श्री गणेश अष्टकम् गणपतीकडे पाहण्याची यापेक्षा व्यापक आणि तात्त्विक दृष्टी देते. या स्तोत्रात गणेशाला केवळ विघ्नहर्ता किंवा बुद्धीची देवता न मानता, संपूर्ण सृष्टीच्या अस्तित्वामागील तत्त्व आणि अखेरीस ‘परब्रह्म’ म्हणून मांडले आहे. ‘अष्टकम्’ म्हणजे आठ श्लोकांची रचना. या स्तोत्राच्या मुख्य भागात गणपतीची स्तुती करणारे आठ श्लोक असून त्यानंतर फलश्रुतीचे पाच श्लोक येतात. त्यामुळे संपूर्ण रचनेत १३ श्लोक आहेत. इथले ‘अष्ट’ गणपतीच्या आठ स्वतंत्र रूपांकडे निर्देश करत नाही; तर गणेशाला सृष्टीचे कारण, अनंत शक्तींचे अधिष्ठान, सर्व जीवांचे आधारतत्त्व, बुद्धीचे अधिष्ठान, अज्ञाननाशक, विघ्ननाशक, कार्यसिद्धिदाता आणि शेवटी परब्रह्म अशा विविध तात्त्विक रूपांत आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा