सीडीएस अनिल चौहान यांनी सिंगापूरला झालेल्या कार्यक्रमात जी मुलाखत दिली त्यावेळी भारताची जेट्स पडली असे वक्तव्य केले. त्यावरून भारत सरकारने देशाची दिशाभूल केल्याचे विधान काँग्रेसने केले. सत्य जाणून घेण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलवा असे त्यांचे म्हणणे कायम आहे. पण खरोखरच काँग्रेसला सत्य जाणून घ्यायचे आहे का?



