भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान संतापला आहे. दररोज, या करारावरून ते भारताला धमक्या देत आहे. सिंधू पाणी करार स्थगित केल्याच्या प्रत्युत्तरात, त्याचा मित्र चीन कदाचित भारतात ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवेल, अशी भीती आणि धमकी देण्याचा प्रयत्न पाककडून केला जात आहे. मात्र. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या धमकीला तथ्यांसह उत्तर दिले आहे. जर चीनने ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा प्रवाह कमी केला तर त्याचा फायदाच होईल, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या एका वरिष्ठ सहाय्यकाने भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्याचा हवाला देत इशारा दिला होता की, चीन आपल्या समर्थनार्थ ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा वापर देखील करू शकतो. दरम्यान, यावर मुख्यमंत्री सरमा ट्वीटकरत स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, ‘भारताने जुना आणि एकतर्फी सिंधू पाणी करार बाजूला ठेवल्यापासून, पाकिस्तान एक नवीन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी थांबवले तर काय होईल? आपण ही खोटी कल्पना भीतीने नाही तर तथ्ये आणि राष्ट्रीय स्पष्टतेने मोडूया. ब्रह्मपुत्रा ही एक नदी आहे, जी भारतात उगम पावते, कमी होत नाही. ब्रह्मपुत्रेच्या एकूण पाण्याच्या प्रवाहापैकी चीन फक्त ३०-३५ टक्के वाटा देतो, ते देखील बहुतेक हिमनद्या वितळण्यामुळे आणि मर्यादित पावसामुळे. उर्वरित ६५-७० टक्के पाणी भारतातच येते.’
ते पुढे म्हणाले, ‘अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस पडतो. यामध्ये प्रमुख उपनद्याः सुबनसिरी, लोहित, कामेंग, मानस, धनसिरी, जिया-भारली, कोपिली. मेघालयातील खासी, गारो आणि जयंतिया टेकड्यांमधून उगम पावणाऱ्या कृष्णाई, दिगारू, कुलसी इत्यादी उपनद्या या ब्रह्मपुत्रा नदीचे मुख्य जलस्रोत आहेत. भारत-चीन सीमेवर (ट्युटिंग) ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह २,०००-३,००० घनमीटर/सेकंद आहे, तर गुवाहाटीसारख्या आसामच्या मैदानी प्रदेशात पावसाळ्यात हा प्रवाह १५,०००-२०,००० घनमीटर/सेकंद होतो.
हे ही वाचा :
काँग्रेसला सत्य जाणूनच घ्यायचं नाही !
…हा तर पश्चिम बंगालमधला मविआ पॅटर्न
राज्यात घातापाताचा कट- साकीब नाचनच्या २२ कट्टर समर्थकांच्या निवासस्थानावर एटीएसची छापेमारी!
राणी बागेत जन्मलेल्या पेंग्विन्सच्या पिल्लांची नावे मराठीत हवी!
ब्रह्मपुत्रा भारतात प्रवेश केल्यानंतर मजबूत होते. ही एक भारतीय, पावसावर अवलंबून असलेली नदी प्रणाली आहे, जी कोणत्याही एका स्रोतावर अवलंबून नाही. पाकिस्तानने सत्य जाणून घेतले पाहिजे, जर चीनने ब्रह्मपुत्रेतील पाण्याचा प्रवाह कमी केला (ज्याबद्दल त्याने (चीन) आतापर्यंत कधीही सांगितले नाही किंवा कोणत्याही व्यासपीठावर इशाराही दिला नाही), तर भारतालाच फायदाच होईल, कारण दरवर्षी आसाममधील विनाशकारी पुरामुळे लाखो लोक विस्थापित होतात आणि मोठ्या प्रमाणात विनाश होतो.
अगर चीन ब्रह्मपुत्र का पानी रोक दे तो क्या होगा?
पाकिस्तान की नई डराने वाली कहानी का करारा जवाबभारत द्वारा जब से पुरानी और एकतरफा सिंधु जल संधि को दरकिनार किया गया है, पाकिस्तान एक नई घबराहट फैलाने की कोशिश कर रहा है:
“अगर चीन ब्रह्मपुत्र का पानी रोक दे तो?”आइए इस झूठी कल्पना… https://t.co/TUxqql3AIj
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) June 2, 2025
