मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांचे पोस्टर्स या पूर्वी हिंदू जननायक असे लागलेले होते. कपाळावर भगवा टिळा, गळ्यात शाल अशा पद्धतीचे फोटो हे त्यांचे सर्वत्र झळकत होते. मात्र नुकतंच यांनी कुंभमेळ्यावर जे वक्तव्य केले त्यामुळे तमाम हिंदू धर्मियांची, श्रद्धाळूची मनं कुठेतरी दुखावली गेली.