28.6 C
Mumbai
Sunday, August 2, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअमित शहांचा नाद करायचा नसतो...

अमित शहांचा नाद करायचा नसतो…

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती आणि त्यांचे राजकारण काँग्रेससाठी एखाद्या भयस्वप्न राहीलेले आहे. देश बऱ्यापैकी काँग्रेसमुक्त करण्यात शहांचे योगदान मोठे आहे. तरीही काँग्रेस पुन्हा एकदा अमित शहा यांच्याशी पंगा घेण्याच्या तयारी आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची घोषणा केली. त्यामुळे सोमवार पासून संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु विरोधकांनी आज देखील संसदेचे कामकाज बंद पाडले. ‘धर्मेंद्र प्रधान तो झांकी है, अमित शहा है’, अशा घोषणा देत विरोधीनी आपला अजेंडा स्पष्ट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही मोदी सरकारची भक्कम तटबंदी आहे. ते जोपर्यंत आहेत, तो पर्यंत सरकारचा चिराही ढळणार नाही, हे विरोधकांना ठाऊक आहे. त्यामुळे काँग्रेसने जुना खेळ सुरू केला आहे. सार्वजनिक जीवनात काँग्रेसचा लौकीक पडद्यावरच्या शक्ती कपूरसारखा आहे, परंतु तरीही ते भारत भूषण असल्याचा आव आणत जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतात. काँग्रेस नेते विद्यार्थ्यांच्या संतापाचा रोख आता अमित शहा यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जंतर मंतरवर आंदोलकांवर पेलेट गन आणि बिहारमध्ये आंदोलकांवर एक-४७ ने गोळीबार कऱण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी पत्र लिहून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा