37 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरविशेषमुंबईत १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू

मुंबईत १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू

Google News Follow

Related

देशातील आणि राज्यातील ओमिक्रोन रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी मुंबईत कलम १४४ लागू केला आहे. नव वर्षाला लोक एकत्र जमत असतात, होणाऱ्या पार्टी, कार्यक्रम या पार्श्वभूमीवर मुंबईत १६ दिवसांसाठी १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता नव वर्षाच्या कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही.

जगभरात खळबळ माजवणारा ओमिक्रोनने भारतात आणि राज्यात शिरकाव केला असून राज्यात ओमिक्रोनचे तब्बल २८ रुग्ण आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी मुंबईत कलम १४४ लागू केले असून कोरोना आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिपत्रक काढत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू केले आहेत. कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे ही वाचा:

ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी

आंबेडकर द लिजंड मध्ये हा अभिनेता करणार बाबासाहेबांची भूमिका

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला भारतात आणले

संतापजनक! MPSC ने केली मृत स्वप्निल लोणकरची क्रूर थट्टा

पोलिसांनी परिपत्रकात काय म्हटले आहे?

  • दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले हवे. याठिकाणी भेट देणाऱ्या व्यक्ती, ग्राहक यांचेही पूर्ण लसीकरण झाले पाहिजे.
  • मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या सर्वांचे पूर्ण लसीकरण झालेले हवे.
  • एखाद्या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या व्यक्ती, पाहुणे, ग्राहक आदींचे पूर्ण लसीकरण झालेले हवे.
  • महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणी वैध असेल.
  • कोणत्याही कार्यक्रम, मेळावे, समारंभ, स्पर्धा याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागेल.

या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा