30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरविशेषरेल्वेमध्ये अग्निवीरांसाठी १५ टक्के जागा राखीव

रेल्वेमध्ये अग्निवीरांसाठी १५ टक्के जागा राखीव

अग्निवीर म्हणून जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांसाठी आनंदाची बातमी

Google News Follow

Related

अग्निवीर म्हणून जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने सरळ नोकरभरतीमध्ये अग्निवीरांसाठी सुमारे १५ टक्के पदे आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने याबाबत १० मे रोजी सर्व झोनल रेल्वे महाप्रबंधक आणि रेल्वे भरती बोर्डाला मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अग्निवीर म्हणून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना रेल्वेच्या नोकरीची दारे खुली होणार आहेत.

रेल्वे मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्तर १ मधील चतुर्थ श्रेणीमध्ये म्हणजे गँगमन, ट्रॅकमन, खलाशी, पॉइंटमॅन आदी रिक्त पदांवर अग्निवीरांना १० टक्के आरक्षण दिले जाईल. तसेच, स्तर-२ मध्ये ज्युनिअर क्लार्क, टायपिस्ट, अकाऊंटंट, ज्युनिअर टाइम कीपर, ट्रेन क्लार्कसहित बिगर राजपत्रित रिक्त पदांवर पाच टक्के आरक्षण मिळेल. तसेच, स्तर १मधील रिक्त पदे रेल्वे भरती सेलमधून भरले जातील. स्तर-२मधील पदांची भरती प्रक्रिया आरआरबी आयोजित करेल.

अग्निवीरांना लिखित परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. मात्र त्यांना शारीरिक चाचणीमधून सवलत मिळेल. पहिल्या बॅचमधील अग्निवीरांच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत मिळेल. त्यानंतरच्या बॅचमधील अग्निवीरांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट मिळेल. या राखीव कोट्यामध्ये जर अपेक्षित अग्निवीरांचे अर्ज न आल्यास दुसऱ्या आरक्षित वर्गातील तरुणांना संधी दिली जाईल.

हे ही वाचा:

‘भारत पे’चे माजी प्रमुख अशनीर ग्रोव्हर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

स्पॅम कॉल्सवरून भारत सरकारने दिला व्हॉट्सअपला दिला इशारा

एलन मस्क ‘ट्विटर’च्या सीईओपदाचा राजीनामा देणार

बॉडी बिल्डर संकल्प भाटकरला आईच्या हत्येप्रकरणी अटक

सीआयएसएफमध्ये महिला कॉन्स्टेबलच्या भरतीचा विचार

सीआयएसएफमध्ये पुरुषांच्या समकक्ष कॉन्स्टेबल/चालक आणि कॉन्स्टेबल/चालक-सह-पंप ऑपरेटरच्या पदासाठी महिलांची भरती करण्याचा विचार केला जात आहे. केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली. केंद्र सरकारने भरती नियमांची संशोधनप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आठ आठवड्यांची मुदत मागितली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
73,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा