26 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरविशेषसापडले १५०० वर्षापूर्वीचे गुप्त काळातील मंदिराचे अवशेष

सापडले १५०० वर्षापूर्वीचे गुप्त काळातील मंदिराचे अवशेष

Related

उत्तर प्रदेशमधील एटा जवळील बिलसारा गावात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाला (एएसआय) मंदिराचे अवशेष सापडले आहेत. सापडलेले मंदिराचे अवशेष पाचव्या शतकातील, गुप्त काळातील आहेत. मागच्या महिन्यात केलेल्या उत्खननातून जिने सापडले असून त्यावर शंखलिपी असलेला शिलालेख सापडला होता. ‘श्री महेंद्रदित्य’ असे शिलालेखात लिहिलेले असून ते कुमारगुप्त- १ या गुप्त राजाचे आहे. या राजाने पाचव्या शतकात उत्तर- मध्य भारतावर राज्य केले होते.

बिलसारा हे स्थळ १९२८ पासून संरक्षित असून गुप्त काळाची माहिती देणारे महत्त्वाचे स्थळ आहे. या स्थळावर नक्षी आणि मानवी आकृत्या असलेले दोन स्तंभ होते. या स्तंभांचे अधिक महत्त्व समजून घेण्यासाठी पुढील उत्खनन केले असता जिने सापडले, असे एएसआय आग्रा सर्कलचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ वसंत स्वर्णकार यांनी सांगितले. जिन्यावर असलेल्या शिलालेखात श्री महेंद्रदित्य असून ती पदवी कुमारगुप्त- १ ची आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हे ही वाचा:

ममतांचा पुन्हा पराभव करायला भाजपाकडून ‘या’ महिलेला उमेदवारी

तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा

चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

नुकतेच मिळालेले अवशेष हे स्थळाची साफसफाई करत असताना मिळाले. पावसाळा संपत असताना एएसआयच्या सर्व संरक्षित स्मारकांवरील वाढलेले गवत आणि वाढलेली झुडपे काढण्याचे काम केले जाते त्यादरम्यान हे अवशेष मिळाले आहेत. एटा येथे सापडलेला शिलालेख पूर्वी एका घोड्याच्या प्रतिमेवर दिसला होता. ही प्रतिमा आता लखनौच्या राज्य वस्तुसंग्रहालयात आहे. घोड्याच्या प्रतिमेवरील आणि नव्याने मिळालेला शिलालेख शंखलिपीतील असल्याचे प्रख्यात एपिग्राफीस्ट देवेंद्र हंडा आणि एएसआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एटामध्ये आतापर्यंत सापडलेले हे तिसऱ्या मंदिरांचे अवशेष आहेत. गुप्त हे पहिले होते ज्यांनी संरचनात्मक मंदिरे बांधली. एटा येथे सापडलेल्या मंदिराच्या अवशेषांपूर्वी केवळ दोन ठिकाणी मंदिरे आढळली आहेत. मात्र आता सापडलेल्या स्तंभावर चांगल्या प्रकारे कोरीवकाम केलेले आहे, असे अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रा. मनवेंद्र पुंधीर यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा