31 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरविशेषउत्तराखंडमधील छोट्याशा खेड्यात प्रत्येक घरात एक निकिता...

उत्तराखंडमधील छोट्याशा खेड्यात प्रत्येक घरात एक निकिता…

Related

गेल्या महिन्यात १५ वर्षीय निकिता चंदने दुबईत झालेल्या आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण जिंकले. उत्तराखंडमध्ये आल्यावर निकिताचे स्वागतही तितकेच भावपूर्ण झाले. खास ग्रामपंचायतीने जेव्हा तिच्या स्वागताचा निर्णय घेतला तेव्हा तो अगदी अनोखा होता. निकिताचे स्वागत तर झालेच, पण आता गावातील प्रत्येक घराच्या नामफलक त्या घरातील सर्वात लहान मुलीचे नाव लावण्यात येईल.

सुमारे १५० घर, बदलु या गावात आहेत. हे गाव पिठोरागढपासून १६ किमी दूर धुळागड नेपाळ सीमेच्या मार्गावर आहे. निकिता या आठवड्यात घरी आली. तेव्हापासून या गावामध्ये उत्सवाचे वातावरण आहे. “निकिताने आम्हाला अभिमान वाटावा अशीच कामगिरी केलेली आहे. आमच्या सर्व मुलींनी असेच काम करावे अशी आमची इच्छा आहे, ” असे निकिताचे काका भगवान चंद म्हणाले.“ तिचे यश प्रेरणादायी आहे असेही ते यावेळी म्हणाले. ती फक्त १० वर्षांची होती तेव्हापासून तिने स्वतःला बॉक्सिंग खेळण्यात गुंतवून घेतले होते.

सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ब्रिजेंद्र मल्ला यांनी स्वतःची बॉक्सिंग अकादमी सुरू केली होती. निकिताच्या विजयावर बोलताना तिचे कोच मल्ला म्हणाले, “मी २००४ मध्ये निवृत्त झालो होतो. २०१६ मध्ये निकिता १० वर्षांची असताना मला येथे प्रशिक्षण देण्यास मिळाले.” त्या वर्षी, तिने जिल्हा स्तरावर आणि २०१८ मध्ये हरिद्वार येथे सब-ज्युनिअर राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. पुढच्या वर्षी, तिने नैनीतालमधील बेतालघाट येथे राज्य उप-कनिष्ठ स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्ण जिंकले. तिने त्या वर्षी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरील शालेय खेळ खेळला आणि २०२० मध्ये, आसामच्या गुवाहाटीतील खेलो इंडियाला गेली. “त्या वर्षी तिने अल्मोडा येथील राज्य चाचणी आणि राष्ट्रीय चाचण्यांमध्ये भाग घेतला. तिने दोन्हीमध्ये सोनेच आणले.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या अडसूळ यांच्या घरावर ईडीचे छापे

‘काँग्रेस म्हणजे रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार’

साकीनाक्यात ‘निर्भया’च्या पुनरावृत्तीने खळबळ

पवई तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी अयान ठरला ‘हिरो’

याबाबत बोलताना निकिता म्हणाली, माझी आता कुठे सुरुवात झालेली आहे. अजून मला अनेक नामंवंतांसोबत खेळायचे आहे. मला ऑलिम्पिकमध्ये जायचे आहे आणि माझ्या देशाला सुवर्णपदक मिळवून द्यायचे आहे हे निकिताचे स्वप्न आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा