दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने काल(२१ मार्च) ईडीने अटक केली.दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर काल त्यांना ईडीने ताब्यात घेतले.दरम्यान, या प्रकरणात केजरीवाल यांच्यासह आतापर्यंत ईडीने १६ जणांना अटक केली आहे.
ईडीने १५ मार्च रोजी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी राव यांची कन्या के कविता यांना हैद्राबाद येथून अटक केली होती.बीआरएस नेत्या के कविता यांच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे.दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मनीष सिसोदिया आंणि संजय सिंह याना यापूर्वीच अटक केली आहे.पीएमएलएच्या कलम-३ आणि कलम-४ अंतर्गत मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली या नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
ऐतिहासिक यश; इस्रोच्या ‘पुष्पक’ची यशस्वी चाचणी!
‘जावेदने साजिदला माझ्या घरी आणले; त्याची आमच्यासमोर चौकशी करा’
कोइम्बतूरमधून अण्णामलाई यांना उमेदवारी देण्यामागे भाजपचा उद्देश काय?
दारू घोटाळ्याप्रकरणी पहिली अटक २०२२ मध्ये करण्यात आली होती.ईडीने समीर महेंद्रू यांना २८ सप्टेंबर २०२२ रोजी अटक केली होती.समीर महेंद्रू हे देशातील मोठे दारू व्यावसायिक आहेत.दारू घोटाळ्याप्रकरणी दोन पेमेंट केल्याचा समीर महेंद्रू यांच्यावर आरोप आहे.त्यापैकी एक कोटीचे पहिले पेमेंट मनीष सिसोदिया यांचे निकट वर्तीय दिनेश अरोरा यांना आणि दुसरे २ ते ४ कोटीचे पेमेंट गुरुग्राम येथील अर्जुन पांडे याना केले आहे.एजन्सीचा दावा आहे की, पांडे याने विजय नायर याच्या बोलण्यावर पैशांची वसली केली होती.
दरम्यान, दारू घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत समीर महेंद्रू, पी शरत चंद्र रेड्डी,बिनॉय बाबू, विजय नायर, अभिषेक बोईनपल्ली, अमित अरोडा याना ईडीने अटक केली आहे.२०२२ मध्ये ही अटक झाली होती.२०२३ मध्ये गौतम मल्होत्रा, राजेश जोशी, राघव मगुंटा,अमन धाल, अरुण पिल्लई, मनीष सिसोदिया, दिनेश अरोडा, आणि संजय सिंह याना अटक केली आहे.२०२४ मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ही दुसरी अटक आहे.