अहमदाबाद शहरातील बापूनगर परिसरातील अकबरनगरमध्ये अहमदाबाद महानगरपालिका (AMC) च्या इस्टेट विभागाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली. एसपी ऑफिसच्या मागे, अजित मिल चौकाजवळील या वसाहतीत सुमारे ४०० पेक्षा अधिक बेकायदेशीर झोपड्या आणि मातीच्या छोट्या घरांचा समावेश होता. पाच JCB आणि आठपेक्षा अधिक Hitachi मशीनच्या मदतीने, कडक पोलिस बंदोबस्तात ही कारवाई अवघ्या दोन तासांत पूर्ण करण्यात आली.
AMC अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांना नोटीस देण्यात आल्या होत्या. २०१४ मध्ये, २२१ रहिवाशांना वटवा भागात पर्यायी घरे देण्यात आली होती, मात्र त्यापैकी ७६ कुटुंबे अजूनही अकबरनगरमध्ये राहत होती. घरे पाडल्यानंतर ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर जमीन समतल केली जाईल आणि पुढील अतिक्रमण टाळण्यासाठी भिंत उभारली जाईल.
AMC उत्तर विभागाचे उपायुक्त विशाल खानमा यांनी सांगितले की, “अकबरनगर छापरा वसाहतीतील महापालिकेच्या जमिनीवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ५ JCBs, २ Hitachi ब्रेकर, ७ Hitachi मशीन आणि १४ इतर मोठ्या मशीन वापरण्यात आल्या. सुमारे १०० मजुरांची मदत घेऊन, एकूण १५,००० चौरस मीटर क्षेत्र साफ करण्यात आले. अतिक्रमणाबाबत याआधी नोटिसा दिल्या होत्या आणि आजची कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि प्रचंड पोलिस बंदोबस्तात पार पडली.
हे ही वाचा:
भारतीय ज्युनियर महिला संघाला शूटआउटमध्ये चिलीकडून पराभव
दिल्ली पोलिसांनी केले १००० बांगलादेशींना हद्दपार!
इतिहासातला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी स्कोर
‘निष्पाप भारतीयांबद्दल नाही, पाकिस्तानच्या मृतांबद्दल शोक कसा काय व्यक्त करता?’
H विभागाचे ACP आर. डी. ओझा यांनी सांगितले की, “कारवाईदरम्यान संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात आले. २ ACPs, ९ PIs, २७ PSIs, सुमारे ४०० पोलीस कर्मचारी आणि १० SRP तुकड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता. ही ध्वस्ती शांततेत पार पडली.”
AMC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोकळ्या जागेचा उपयोग वाचनालय, उद्यान किंवा वॉर्ड कार्यालयासारख्या सार्वजनिक सुविधांसाठी करण्याचा विचार सुरु आहे. भविष्यातील अतिक्रमण टाळण्यासाठी सीमा भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
