25 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेष५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याचे रडगाणे गाणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आकडेवारीतून चपराक

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात असून त्यांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारी जाहीर करून उत्तर दिले आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत बराच पुढे असल्याचा पुरावाचं देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सोशल मीडिया ‘एक्स’वर देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी शेअर करत संपूर्ण राज्याचे अभिनंदन केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असून त्यांनी महाराष्ट्राचे अभिनंदनही केले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. तसेच २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी मांडत म्हटलं आहे की, “या सर्व राज्यांमधील परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १,३४,९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७०,७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यात १,१८,४२२ कोटी, (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) २०२३-२४ मध्ये १,२५,१०१ कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती.

हे ही वाचा : 

आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश !

३०० फूट खोल दरीत कोसळून लष्कराच्या वाहनाला सिक्कीममध्ये अपघात; चार जवान हुतात्मा

कर्नाटकचा अजब शिक्षक दिन! हिजाब बंदी करणाऱ्या शिक्षकाचा पुरस्कार घेतला मागे!

राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३,६२,१६१ कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही पाच वर्षांचे काम करुन दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे, असं मत त्यांनी मांडले आहे.

राज्ये आणि त्यांना मिळालेली परकीय गुंतवणूक

  • महाराष्ट्र – ७०,७९५ कोटी रुपये
  • कर्नाटक – १९,०५९ कोटी रुपये
  • दिल्ली – १०,७८८ कोटी रुपये
  • तेलंगणा – ९,०२४ कोटी रुपये
  • गुजरात – ८,५०८ कोटी रुपये
  • तामिळनाडू – ८,३२५ कोटी रुपये
  • हरयाणा – ५,८१८ कोटी रुपये
  • उत्तर प्रदेश – ३७० कोटी रुपये
  • राजस्थान – ३११ कोटी रुपये
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा