29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषसावधान.. १३५ दिवसानंतर कोरोनाचे सक्रिय रुग्ण गेले १० हजारांच्यावर

सावधान.. १३५ दिवसानंतर कोरोनाचे सक्रिय रुग्ण गेले १० हजारांच्यावर

देशात आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख ०५ हजार ९५२ लोक संसर्गाच्या विळख्यात

Google News Follow

Related

देशातील कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाची जाहीर करण्यात येत असलेली आकडेवारी धक्का देणारी आहे. देशभरात १३४ दिवसांनंतर, रविवारी, देशात कोरोनाची सक्रिय प्रकरणे दहा हजारांहून अधिक झाली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली आहे. आकडेवारीनुसार, रविवारी देशात १,८०५ लोकांना  संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. रुग्ण वाढल्याने संसर्गाचे प्रमाण ३.१९ टक्के झाले आहे.

दैनिक सकारात्मकता दर ३.१९ टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, साप्ताहिक पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण १.३९ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आता एकूण १० हजार ३०० रुग्ण उपचार घेत आहेत.गेल्या २४ तासांत देशात सहा जणांचा संसर्ग झाला आहे. यासह, संसर्गामुळे मृतांची संख्या ५,३०,८३७ वर पोहोचली आहे. चंदीगड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये २४ तासांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये दोन मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख ०५ हजार ९५२ लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, यामध्ये ०.०२ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर ९८.७९ टक्के लोक बरे झाले आहेत. मृत्यू होणायचे प्रमाण १. १९ टक्के आहे . देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोविड लसीचे २२०.६५ कोटी डोस देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी

तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे

परिवारवादाची तळी उचलण्याचे दिवस आता संपले प्रियांकाजी!

एका आठवड्यात ७८ टक्के प्रकरणे वाढली
गेल्या सात दिवसांत संसर्गाच्या प्रकरणांमध्ये ७८% ची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच १९ ते २५ मार्च दरम्यान ८,७८१ नवीन कोरोना रुग्ण आढळले. यापूर्वी १२ ते १८ मार्च दरम्यान देशात ४,९२९ बाधित आढळले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा