राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, तोपर्यंत पवित्र संस्थांचा सन्मान राखणं खूप कठीण!

आचार्य प्रमोद कृष्णम यांची टीका

राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, तोपर्यंत पवित्र संस्थांचा सन्मान राखणं खूप कठीण!

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांकडून महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या हालचालींवर माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जोपर्यंत राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, तोपर्यंत भारतातील संविधानिक संस्थांचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि संसदेसारख्या पवित्र संस्थांचा सन्मान राखणं खूप कठीण आहे.

एका कटाचा भाग म्हणून राहुल गांधी देशाची बदनामी करू इच्छित आहेत. नवीन संसद भवन उभारण्यात आलं, तेव्हा राहुल गांधींनी विरोध केला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रणही त्यांनी नाकारलं. त्यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयावर बोट ठेवलं, संसदेला अनादर दाखवला आणि आता ते निवडणूक आयोगालाही ‘चोर’ म्हणत आहेत, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.

राहुल गांधी ज्या निवडणूक आयोगाला चोर म्हणत आहेत, त्याच आयोगाच्या प्रमाणपत्रामुळे ते खासदार आहेत. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याआधी, राहुल गांधी यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. आणि त्याचप्रमाणे सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा.”

दरम्यान, बिहारातील मतदार यादीतील कथित गोंधळ आणि मतचोरीच्या आरोपांमुळे विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवार, १८ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसद भवनातील कार्यालयात इंडी आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत, सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झाली.

काँग्रेसचे खासदार सैयद नासिर हुसैन म्हणाले, “या विषयावर पक्षाच्या पातळीवर अजून कोणतेही औपचारिक विचारमंथन झालेले नाही, पण गरज भासल्यास काँग्रेस नियमानुसार महाभियोग प्रस्ताव आणू शकते.”

हे ही वाचा : 

कझाकस्तानमध्ये विमान अपघातात दोन जणांचा मृत्यू

दिल्लीत सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट!

दूरसंचार क्षेत्राचा ऑपरेशनल नफा १२-१४ टक्क्यांनी वाढेल

धनबाद जिल्ह्यात भू-स्खलनने धडकी

Exit mobile version