33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषहा तर महापालिकेचा निष्काळजीपणा!

हा तर महापालिकेचा निष्काळजीपणा!

Google News Follow

Related

चेंबूर दुर्घटनाप्रकरणी आ. आशीष शेलार यांनी केली टीका

चेंबूर वाशी नाका येथे भिंत कोसळून त्यात जवळपास १७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनास्थळाला भेट देऊन तेथील बचावकार्याची पाहणी भाजपा नेते ऍड. आमदार शेलार यांनी केली. त्यावेळी त्यांनी या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतानाच हा महानगरपालिकेचा निष्काळजीपणा असल्याची टीकाही केली.

ते म्हणाले की, या घटनेतील पीडित कुटुंबियांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. त्या परिवारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली पाहिजे, पाण्याचा त्वरेने निचरा केला पाहिजे. भिंत धोकादायक असेल तर ती काढून टाकायला हवी. या तिन्ही गोष्टी झटपट व्हायला हव्यात. राज्य सरकारनेही त्यात मदत करावी.

हे ही वाचा:
हँग झालेल्या वेबसाईटचीही आता चौकशी होणार

‘वंदे भारत’ गाड्यांनी जोडणार ४० नवी शहरे

चेंबूरच्या किंकाळ्या आधी ‘दिल्लीत’ नंतर ‘मुंबईत’ ऐकू आल्या!

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठी लोकप्रियता

ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे नेते भेट देऊन गेले ते योग्यच आहे. पण त्यांनी ठोस निर्णय घ्यायला हवेत. या प्रकरणी आणि अशा इतर वस्त्यांबद्दल कोणतीही आढावा बैठक त्यांनी घेतल्याचे दिसत नाही.

अशा दुर्घटनांचे चित्र दुर्दैवाने मुंबईत पाहायला लागत आहे. ज्या मुंबईत सगळ्या व्यवस्था वीजेच्या गतीने उभ्या करता येऊ शकतात. महानगरपालिकेकडे निधीची, तज्ज्ञांची आणि अधिकाऱ्यांचीही कमतरता नाही, पण इच्छाशक्ती कमी आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ होतो आहे. हा महानगरपालिकेचा निष्काळजीपणा आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा