महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपा नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. याच दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत टीका केली. राज ठाकरेंनी स्वतःची अवस्था बघावी आणि टीका करावी, असे भातखळकर म्हणाले आहेत. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना राजकीय भूमिका सापडत नसल्याने अशी वक्तव्ये करत असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
राज ठाकरे विरोधी पक्षामध्ये असलेले नेते आहेत आणि त्यांना त्यांची मते व्यक्त करण्याचा ११० टक्के अधिकार आहे. पण गंगा नदीचे पाणी त्याच्या नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे कायम सिद्ध राहते. हे खरे आहे कि गेल्या ५०-६० वर्षांमध्ये गंगा नदी प्रदूषित होत चालली होती. राजीव गांधी यांनी एक प्रकल्प हाती घेतला होता मात्र दुर्दैवाने तो यशस्वी नाही झाला, अये अतुल भातखळकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमामि गंगा’ या नावाखाली गेल्या १० वर्षांपासून हा प्रकल्प हाती घेतला आहे. गंगा नदी शुद्धीकरणासाठी अनेक योजना आहेत, त्या पूर्णत्वाला पोहोचल्या आहेत. तेथील स्थानिक लोक कारखान्यासह इतर माध्यमातून सांडपाणी गंगा नदीमध्ये सोडतात, त्यामुळे गंगा नदी अशुद्ध होत असते. पण त्याच्या शुद्धीकरणाकडे आपण वेगाने चाललो आहोत.
हे ही वाचा :
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने केला झेल सोडण्याचा विक्रम
आयुष्मान कार्डमुळे वृद्धाला मिळाले मोफत उपचार; पंतप्रधान मोदींना धन्यवाद
मालेगावात जिवंत व्यक्तीने बनवला स्वतःचा मृत्युचा दाखला
मुंबईतील नागपाड्यात पाण्याची टाकी साफ करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू!
गंगा नदी समस्त देशवासियांचा श्रद्धेचा विषय आहे. ब्रिटीश काळापासून गंगेचे पाणी बोटीने नेण्याची पद्धत होती. कारण ते वर्षानुवर्षे चांगल्या स्वरुपात टिकण्याची क्षमता त्यामध्ये आहे. गंगा नदी भारतीय एकात्मतेचे फार मोठे प्रतिक आहे. राज ठाकरेंवर टीका करताना भातखळकर म्हणाले, आता कोण देवळात जातं आणि तिकडे कोण नवस करतं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे स्वतः आपली अवस्था काय आहे हे बघावे आणि टीका करावी.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा राजकीय प्रॉब्लेम असा आहे कि त्यांना राजकीय भूमिकाच सापडत नाहीये. त्यामुळे कधी ते म्हणतात आणि हिंदुत्व सोडले नाही, हिदुत्वाशी आमचा काही संबंध नाही. कधी काँग्रेसशी युती करतात. त्यामुळे नक्की भूमिका काय आहे?, हे समजत नसल्यामुळे ते अशी विधाने करत असतात, असे अतुल भातखळकर म्हणाले.