रमझानच्या महिन्यात मैत्रीण आणि बायकोने संभोगास नकार दिल्यामुळे दोन तरुणांनी एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अत्याचार केले आणि त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
कानपूर येथील या घटनेनंतर एकाला पकडण्यात यश आले असून दुसरा आरोपी फरार आहे. पकडल्या गेलेल्या आरोपीने या हत्येची कबुली दिली असून त्याचे कारण समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
अझर आणि हुसैनी अशी या दोन आरोपींची नावे असून त्यातील हुसैनी याला अटक करण्यात आली आहे. त्याने या घटनेमागील कारण सांगितले. सदर मुलगा हा जिमला जात असताना त्याचे अपहरण या दोघांनी केले. त्याला आडरानात नेऊन त्याला बांधून ठेवण्यात आले. नंतर त्याच्यावर अत्याचार केले आणि त्याला दोरीला लटकावून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून दिला.
हुसैनीने सांगितले की, त्यांच्या बायकांनी रमझानच्या महिन्यात संभोगास नकार दिल्यामुळे दोघांनी हे पाऊल उचलले. हुसैनी म्हणाला की, माझी मैत्रीण आणि अझरची बायको यांनी रमझानच्या काळात संभोगास नकार दिला. हा महिना संपेपर्यंत संभोगास नकार देण्यात आल्यामुळे या दोघांनी एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचे ठरविले. तो दिसायला सुंदर होता. हुसैनीने सांगितले की, दोघांनी त्या मुलाला सांगितले की, ते एका कॉल गर्लला भेटायला जात आहेत. त्यासाठी सोबत येण्यास त्याला सांगितले. ५ मार्चपासून हा मुलगा गायब होता.
हे ही वाचा:
आयुष्मान कार्डमुळे वृद्धाला मिळाले मोफत उपचार; पंतप्रधान मोदींना धन्यवाद
रोहित सलग बारा वेळा टॉस हरला; ब्रायन लाराशी बरोबरी!
राजस्थानमध्ये ४५ कुटुंबांची घरवापसी!
इंडियन वेल्स: ५ वेळा चॅम्पियन जोकोविच पहिल्याच सामन्यात पराभूत
दुसऱ्या दिवशी हुसैनी त्या मुलाच्या कुटुंबियांकडे गेला आणि त्याने त्यांना फोन तपासण्यास सांगितले. कदाचित एखाद्या अपहरणकर्त्याने काही मेसेज वगैरे केला असेल तर तपासून घ्या, असे हुसैनी म्हणाला. फोन तपासल्यावर त्या मुलाच्या काकांच्या फोनमध्ये एक मेसेज दिसला त्यात १० लाखांची मागणी करण्यात आली होती. त्या मुलाच्या पालकांना नंतर लक्षात आले की, ज्या दिवशी त्यांचा मुलगा गायब झाला त्याच दिवशी हुसैनीही गायब होता. पोलिसांनी ही माहिती दिल्यावर त्यांनी हुसैनीची चौकशी केली तेव्हा तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला. शेवटी पोलिसांनी त्याला इंगा दाखवताच त्याने सगळी कबुली दिली. त्याचा मित्र अझर हादेखील त्या कृत्यात सहभागी असल्याचे त्याने सांगितले. आता अझरचा शोध पोलिस घेत आहेत.