मुंबईतील कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अतुल भातखळकर त्यांच्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून त्यांच्या कुटुंबियांसाठी वेळ काढला. पंढरपूर येथे जाऊन त्यांनी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची भेट घेतली आणि मुंबईत परतताना नवीन ऊर्जा आणि उत्साह आणल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी ‘एक्स’वर त्यांच्या आजींच्या भेटीचा फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे.
आमदार अतुल भातखळकर हे पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी त्यांनी त्यांची आजी, म्हणजेचं त्यांच्या मातोश्रींच्या काकू लीलाबाई नरसिंह आराध्ये यांची भेट घेतली. भेट घेतल्यावर अतुल भातखळकर म्हणाले की, काही लोकांशी आपली नाळ लगेचच जुळते. आजीबाई त्यातल्या एक. मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात त्यांच्यासाठी एक खास राखीव जागा असते. प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांच्या या आजी सख्या भगिनी आहेत. त्यांचे वय १०१ वर्षे असून त्यांचा मेंदू तल्लख असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले. आजही एखाद्या विषयावर चर्चा करण्याचा उत्साह आजींमध्ये कायम असतो. आजींची भेट घ्यायला गेल्यावर त्यांनी विचारले, तिसऱ्यांदा आमदार झालास ना? आणि इथून गप्पा सुरू झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. छान वाटलं, अशी आठवण आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितली. तसेच मुंबईत परतताना आजींकडून थोडा उत्साह आणि ऊर्जा घेऊन आल्याचे अतुल भातखळकर यांनी सांगितले. यावेळी अतुल भातखळकर यांच्या पत्नी रश्मी भातखळकर या ही उपस्थित होत्या.
अलिकडेच पंढरपूरात जाऊन आलो. श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे होतेच, शिवाय माझी आजी, म्हणजे माझ्या आईची काकू लीलाबाई नरसिंह आराध्ये यांचीही भेट घ्यायची होती.
काही लोकांशी आपली नाळ लगेचच जुळते. आजीबाई त्यातल्या एक. मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात त्यांच्यासाठी एक खास राखीव जागा असते.… pic.twitter.com/mKLxOfs2Zq— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 4, 2025