महाकुंभाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करणाऱ्यांवर पोलिस कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहेत. आतापर्यंत याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेपाळमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तो प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील असल्याचा दावा या लोकांनी केला होता. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
मौनी अमावस्येच्या स्नानोत्सवानिमित्त महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्याबद्दल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. नेपाळमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत “महाकुंभ २०२५ प्रयागराज म्हणजे मृत्युचा महाकुंभ…” असे लिहून सोशल मिडीयावर व्हिडीओ शेअर केला होता.
‘चेंगराचेंगरीच्या घटनेत एका कुटुंबातील तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुटुंबातील सदस्य शवविच्छेदन गृहातून मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत. किमान त्यांनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह त्यांच्या जन्मस्थळी पोहोचवण्यास मदत करावी’, असे लिहून अफवा पसरवण्याचे काम सुरु होते. पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा :
जात सर्वेक्षण करून काँग्रेसने स्वतःच्या पायावर मारला धोंडा!
पश्चिम बंगाल: सरस्वती पूजे दरम्यान अनेक ठिकाणी मूर्तींची तोडफोड!
मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर!
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना विभागात ८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप
या व्हिडिओची सत्यता पडताळणी केली असता, तो नेपाळमधील असल्याचे आढळून आले. या संदर्भात, कुंभमेळा पोलिसांनी ट्विटरवर लिहिले आहे की, नेपाळच्या घटनेशी संबंधित असलेला व्हिडीओ महाकुंभचा असल्याचा दावा करत अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. अशा लोकांविरुद्ध कारवाई कुंभमेळा पोलिसांकडून एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई केली जात आहे. या पोस्टसोबत ब्रजेश कुमार प्रजापती नावाच्या एका व्यक्तीच्या पोस्टचा स्क्रीनशॉट देखील जोडण्यात आला आहे, ज्याने व्हिडीओ शेअर करून अफवा पसरवण्याचे कामा केले.