31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरविशेषबॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बंगल्याबाहेर गोळीबार!

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बंगल्याबाहेर गोळीबार!

बंगल्याभोवती पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील बंगल्याच्या दिशेने मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने रविवारी पहाटे गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या बंगल्याभोवती पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या गोळीबार प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या दोघांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा वांद्रे पश्चिम येथे गलेक्सी अपार्टमेंट हा बंगला आहे. रविवारी पहाटे मोटारसायकलवरून दोन अज्ञात व्यक्तीने बंगल्याबाहेर आले व त्यांनी काही कळण्याच्या आता सलमान खान यांच्या बंगल्याच्या दिशेने रिव्हॉल्व्हर मधून चार राउंड फायर करून पळ काढला, या गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिका
नी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या वांद्रे पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असता त्या ठिकाणी पोलिसांना गोळीबार केलेल्या ठिकाणी चार रिकाम्या काडतुसे मिळून आली.

हे ही वाचा:

इराणकडून ड्रोन हल्ला; इस्रायल देणार प्रत्युत्तर

रिझर्व्ह बँकेने पटकावला आरसीएफ टी- २० चषक

गोपी थोटाकुरा ठरणार पहिले भारतीय अंतराळ पर्यटक

आयपीएलच्या ‘या’ पाच संघांकडे आहेत सर्वात मोठे मॅच फिनिशर

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेल्मेट घातलेले दोन इसम मोटारसायकल वरून आले होते, त्यांनी काही कळण्याच्या आत सलमान खानच्या गॅलक्सि अपार्टमेंटच्या दिशेने चार राउंड फायर करून पळ काढला, ही घटना रविवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलेले असून या दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी मुंबई गुन्हे शाखेचे पथक देखील दाखल झालेले असून गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

सलमान खानला पंजाबमधील काही माफिया गटांनी, प्रामुख्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीने लक्ष्य केले आहे. गेल्या काही वर्षांत, सलमान आणि त्याचे वडील, सलीम खान या दोघांनाही कुटुंबाला धमकी देणारी पत्रे पाठवण्यासह विविध माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या घटनेदरम्यान सलमान खान नेमका कुठे होता हे अद्याप अस्पष्ट आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा