अमरावती आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयातून मोठ्या प्रमाणात जन्म दाखले दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर किरीट सोमय्या यांनी मालेगाव आणि अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयांना भेट दिली. यानंतर किरीट सोमय्या यांनी धक्कादायक माहिती उघड करत बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी बांगलादेशी रोहिंग्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात एकूण १४,६४३ अर्ज आले होते, ज्यापैकी फक्त १४९ फेटाळण्यात आले. आतापर्यंत ८३५० जन्मदाखले दिले गेले असून ६१४४ प्रलंबित असल्याचे म्हटले. तसेच मालेगावमधील माहिती समोर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पोलीस निरीक्षक, मालेगाव पोलीस स्टेशनला पत्र लिहित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
जन्म-मृत्यू नोंद प्रक्रियेत तहसीलदाराद्वारे फ्रौड, फोर्जरी आणि बांग्लादेशी/रोहिंग्यांना बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र देण्यावर त्यांनी तक्रार केली आहे. मागील महिन्यात केलेल्या चौकशीत आणि आता केलेल्या चौकशीमध्ये जन्म प्रमाण पत्राच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे किरीट सोमय्या तक्रारीत म्हटले आहे. नाशिक जिल्हाधिकारी यांनी मंत्रालयात जी माहिती पाठवली, त्यात मालेगाव येथे तहसीलदाराने ४३१८ अर्ज आले व त्यातले फक्त १२५ अर्ज फेटाळले गेले. भारतात राहणारे अनधिकृत लोकं, घुसखोर यांना, अश्या हजारो लोकांना पुरावे नसताना प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा :
परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी फडणवीस जाणार दावोसला
एसटी बँकेत गोलमाल! भरती, बदली, प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने करोडो लाटले?
दिल्ली निवडणुका: महिलांना दरमहा २५०० रुपये, गर्भवतींना २१ हजार, जेष्ठांना ३ हजार पेन्शन…
महाकुंभ मेळ्याला ‘अंधश्रद्धा’ संबोधणारे पोस्टर्स, साहित्य नागा साधूंनी केले उद्ध्वस्त
तक्रारीनुसार, याचा अर्ज सुमारे ३००० लोकांना गैरकायदेशीररित्या, भ्रष्टरित्या देशविघातक शक्तींच्या संगनमताने अनधिकृत व्यक्ती, बांग्लादेशी/रोहिंग्यांना मालेगाव येथे जन्म झाल्याचे प्रमाणपत्र तहसीलदार व त्यांच्या सहयोगीने दिले आहे.
अनेक बांगलादेशी/रोहिंग्या घुसखोर, अनधिकृत व्यक्तींनी जन्माचा दाखला घेण्यासाठी खोटे, फसवे कागदपत्रे, फ्रौड, फोर्जरी चीटिंग केली असल्याचे दिसते. खोटे रेशनकार्ड देणे, खोटे अॅफिडेव्हिट दाखल करणे अश्या प्रकारची फसवणूक द्वारा जन्माचा प्रमाणपत्र मिळवणे म्हणजेच भारतीय नागरिकत्व प्राप्त करणे, हा देश विघातक गुन्हा आहे.
बांगलादेशी/रोहिन्यांनी असे करणे हे एका प्रकाराने देश विरोधक कारवाई आहे. असा अर्जदार/व्यक्ती, बांगलादेशी, घुसखोर, रोहिंग्याविरोधात फौजदारी कारवाई करावी गुन्हा दाखल करावा, अशी मालेगाव पोलीस अधीक्षकांकडे किरीट सोमय्या यांनी मागणी केली.
I filled complaint at Malegoan police station against Bangladeshi Rohingyas for submitting fraudulent documents to get Birth Certificates
3,974 Birth Certificates issued to them at Malegoan during 2024
I request police to register FIR under IPC 420, 464, 465, 467, 468, 471 pic.twitter.com/g85r91mobY
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 17, 2025