26 C
Mumbai
Saturday, February 15, 2025
घरविशेषरशियन सैन्यात लढणाऱ्या १२ भारतीयांचा मृत्यू, १६ बेपत्ता!

रशियन सैन्यात लढणाऱ्या १२ भारतीयांचा मृत्यू, १६ बेपत्ता!

परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

Google News Follow

Related

सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात १२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण बेपत्ता आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी (१७ जानेवारी) दिली. मृत भारतीय रशियाच्या बाजूने लढत होते, असे मंत्रालयाने म्हटले आहे. रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या भारतीय नागरिकांना परत पाठवण्याची विनंती करण्यात आल्याचेही मंत्र्यालयाने सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, “१२६ प्रकरणे आहेत (रशियन सैन्यात कार्यरत भारतीय नागरिकांची). या १२६ पैकी ९६ भारतात परतले आहेत आणि त्यांना रशियन सैन्यदलापासून मुक्त करण्यात आले आहे. ते म्हणाले, “अजूनही १८ भारतीय नागरिक रशियन सैन्यात आहेत, त्यापैकी १६ जणांचा ठावठिकाणा माहित नाही. जैस्वाल पुढे म्हणाले, “रशियाने त्यांना बेपत्ता श्रेणीत ठेवले आहे. यांची सुटका आणि त्यांना वापस पाठवण्याची मागणी आमच्याकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या युद्धात केरळमधील ३२ वर्षीय बिनिल बाबू याचा नुकताच मृत्यू झाला होता. तो केरळमधील त्रिशूर येथील रहिवासी असून युक्रेनविरुद्ध लढत होता. त्याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी भारतीय दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसेच आणखी एक भारतीय नागरिक युद्धामुळे जखमी झाला आहे. मॉस्कोमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर तो लवकरच भारतात परतेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

हे ही वाचा : 

बांगलादेशी, रोहींग्याना अनधिकृत जन्मतारखेचे दाखले, सोमय्यानी केली तक्रार!

परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी फडणवीस जाणार दावोसला

एसटी बँकेत गोलमाल! भरती, बदली, प्रोत्साहन भत्ता व बोनसच्या नावाने करोडो लाटले?

दिल्ली निवडणुका: महिलांना दरमहा २५०० रुपये, गर्भवतींना २१ हजार, जेष्ठांना ३ हजार पेन्शन…

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
229,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा