‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’तर्फे दरवर्षी दावोस येथे जागतिक गुंतवणूक-आर्थिक परिषदेचे आयोजन करण्यात येते. यंदाची परिषद २० जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कालावधीत दावोस येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड इनॉकॉनिक फोरम’मध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी महायुती सरकारकडून प्रयत्न केले आहेत.
‘वर्ल्ड इनॉकॉनिक फोरम’मध्ये सहभागी होण्यासाठी १९ तारखेला पहाटे देवेंद्र फडणवीस मुंबईतून रवाना होणार आहेत. राज्यात परकीय गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्या वर्षी सरकारने दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार केले होते. त्यामुळे यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणण्याचे लक्ष्य असणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमध्ये ‘वर्ल्ड इनॉकॉनिक फोरम’मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी औद्योगिक विकासात राज्याने पाचव्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती. राज्यात २०१४- १९ काळात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे दोन वेळा आयोजन झाले होते. आताच्या दौर्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम असून अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौर्यात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकार्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल.
हे ही वाचा :
महाकुंभ मेळ्याला ‘अंधश्रद्धा’ संबोधणारे पोस्टर्स, साहित्य नागा साधूंनी केले उद्ध्वस्त
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा पास्टर अटकेत!
इम्रान खान सपत्निक जाणार तुरुंगात, भ्रष्टाचार प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा!
मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमार ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्यातून केला जाणार आहे. या दावोस दौर्यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न असतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.