महाकुंभ मेळ्यात देशासह जगभरातून भाविक येत असून साधूही दाखल झाले आहेत. महाकुंभमध्ये घडत असलेल्या काही घटनांमुळे हे साधू चर्चेत आले आहेत. चुकीचे प्रश्न विचारणाऱ्या युट्युबर्सला साधूंनी चिमटे आणि झाडूने मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. अशातच नागा साधूंच्या क्रोधाचे दर्शनही महाकुंभ मेळ्यात घडल्याचे समोर आले आहे. प्रयागराज महाकुंभ दरम्यान, आचार्य प्रशांतच्या कथित कार्यकर्त्यांवर काही नागा साधू आणि हिंदू भाविक संतापले. हे कार्यकर्ते महाकुंभ मेळ्याला ‘अंधश्रद्धा’ असे संबोधत पोस्टर फिरवत होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक पोस्टर घेऊन दिसत आहेत ज्यावर लिहिले आहे की, “कुंभ हा अंधश्रद्धेचा मेळा आहे, हे फक्त एक निमित्त आहे. स्वातंत्र्य हवे असेल तर समाज जागृत करा.” तसेच माईकवरून अशा आशयाच्या घोषणाही केल्या जात होत्या. ही घटना लक्षात येताच नागा साधू तेथे जमा झाले आणि पोस्टरवर लिहिलेल्या गोष्टी पाहून संतापले. यानंतर त्यांनी या कार्यकर्त्यांचे सर्व समान उद्ध्वस्त करून टाकले. अपप्रचार करणाऱ्यांनी वापरलेले सर्व साहित्य पेटवून दिले.
हे ही वाचा :
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा पास्टर अटकेत!
मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमार ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित!
भारतातील वाहन उद्योग १२ टक्क्यांनी वाढला
इस्कॉनचे दक्षिण आफ्रिकेतील पहिले संन्यासी महाकुंभ मेळ्यासाठी दाखल
प्रयागराजच्या पवित्र भूमीवर हिंदू धर्मियांना लक्ष्य करण्याचे धाडस दाखविणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याबद्दल सोशल मीडियावर नागाबाबांचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे आचार्य प्रशांत यांच्या अनुयायांनी या घटनेला अपप्रचार असल्याचे म्हटले आहे. नियोजित हल्ला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचा दावा आहे की, हे पोस्टर त्यांच्या कोणत्याही स्वयंसेवकाने बनवलेले नसून ते एका महिलेने बनवले आहे आणि ते तिथेच टाकून दिले आहे. मात्र, जर तसे असेल तर ते आधी का फाडण्यात आले नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस आता या व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहेत. व्हिडिओची सत्यता तपासल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.