इस्रायल-इराणमध्ये नुकतीच युद्धबंदी झाली. भविष्यात पुढे काय होईल याची कल्पना नाही, परंतु सध्या तरी दोनही बाजूने शांततेचे वातावरण आहे आणि त्यांनी युद्धबंदी जाहीर केली आहे. दरम्यान, या युद्धाचे पडसाद भारतातही दिसून आले. इस्रायलविरुद्ध अनेक संघटना, विद्यार्थी पुढे येवून निदर्शने करताना दिसले. विशेष म्हणजे, इराणच्या बाजूने उभे राहणारे हे लोक बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होताना कधी पुढे आले नाहीत, निदर्शने केली नाहीत, न्यायाची मागणीही केली नाही.
दरम्यान, याचे पडसाद पुण्यामध्ये देखील पहायला मिळाले. लोणी स्टेशन परिसरात इराणचे प्रमुख खामेनी यांचे बॅनर आणि इराणचे झेंडे झळकल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात इराण देशाचे झेंडे आणि खामेनी यांचे बॅनर लावण्यात आले होते. लोणी काळभोरमधील हा प्रकार समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल होताच उघडकीस आला होता. या घटनेनंतर संताप व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हे ही वाचा :
नेल्लई मंदिराच्या संपत्तीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती गठीत
फॅक्टरी स्फोट : राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
अर्जित ज्ञानाचा विस्तार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा
कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण सुप्रीम कोर्टात
पोलिसांना याची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल होत आज (३० जून) हे झेंडे आणि बॅनर हटविले. आता हे बॅनर, झेंडे कोणी लावले याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान, अयातुल्ला खामेनी आणि उत्तर प्रदेश यांचे कनेक्शन समोर येत आहे. १९ व्या शतकात खामेनेई यांचे पणजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म बाराबंकी जवळच्या किंतूर गावात झाला होता. मुसावी हे १८३० मध्ये किंतूरहून इराणला गेले आणि तिथेच स्थायीक झाले.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात इराण देशाचे झेंडे आणि राज्याध्यक्ष अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार आज रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. pic.twitter.com/FISGT8GHzY
— जनार्दन दांडगे (@bjp4punegramin) June 29, 2025
